Home नांदेड राज्य सरकारने 13,600 ऐवजी किमान 35,000 ते 50,000 प्रतिहेकटर अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना...

राज्य सरकारने 13,600 ऐवजी किमान 35,000 ते 50,000 प्रतिहेकटर अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावी -वसंत सूगावे पाटील

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0086.jpg

राज्य सरकारने 13,600 ऐवजी किमान 35,000 ते 50,000 प्रतिहेकटर अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावी -वसंत सूगावे पाटील
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान 35,000 ते 50,000 रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणविस सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार(NDRF) 6800 रुपयाच्या दुप्पटीने म्हणजेच 13,600 रुपये प्रतिहेकटर मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सदरील निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे असा प्रकार आहे.NDRF च्या कालबाह्य झालेल्या नियमानुसार असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.याअगोदर 2020 मध्ये सातारा, सांगली जिल्ह्यात अशीच अतिवृष्टी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस तत्कालीन) सरकारने NDRF चे नियम बाजूला करून प्रतिहेकटर 35,000 रुपये आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना भक्कमपणे पुन्हा उभे राहण्यास मदत केली होती त्याचप्रमाणे यावेळीसही सर्व बाबींचा विचार करून अतिवृष्टी मुळे उदभवलेल्या आस्मानी व सुलतानी संकटावर मात करण्यासाठी त्यांच्या लागवडीचा व भविष्यातील उत्पनाचा विचार करून सरासरी किमान 35,000 ते 50,000 रुपये प्रतिहेकटरी आर्थिक मदत जाहीर करून त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे व विरोधी पक्ष नेते मा. ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जांभरूणकर ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडी विभागीय अध्यक्ष संतोष दगडगावकर , जीवा सेना जिल्हाध्यक्ष बालाजीराव हाळदेवाड,,घुंगराळा ग्रामपंचायत सदस्य सुनील यलपलवाड ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नायगाव तालुकाउपाध्यक्ष राजेश ढगे,आशिष रामगिरवार, अमोल,रकटे,विलास ढगे, प्रा. वडजे आदी पदाधिकारी, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे महिला सुरक्षा जनजागृतीसाठी शक्ती रॅली
Next articleव्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी गडचिरोलीच्या विनय भांडेकर ची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here