Home बुलढाणा श्री रामदेवबाबा जीवन आधारित भव्य-दिव्य जम्मा जागरण आयोजन

श्री रामदेवबाबा जीवन आधारित भव्य-दिव्य जम्मा जागरण आयोजन

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0040.jpg

श्री रामदेवबाबा जीवन आधारित भव्य-दिव्य जम्मा जागरण आयोजन

युवा मराठा न्यूज,वेब पोर्टल,पेपर प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार संग्रामपुर

40 वर्षानंतर तेल्हारा मध्ये अफाट संख्येत मोठ्या उत्साहात श्री रामदेव बाबा जन्मा जागरण सोहळा थाटामाटात पार

दिं २/७/२०२२रोजी तेल्हारा मधील भागवत मंगल कार्यालय मध्ये माहेश्वरी तसेच राजस्थानी आराध्यदैवत श्री रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारींत विशाल जम्मा जागरण भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन ठेवण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये आलेले अमरावती जिल्ह्यातील, पांढरी धाम पावन सान्निध्य महंत श्री नरेश बाबा यांची उपस्थिती लाभली असुन भजन,गायन-स्वर अकोला येथील प्रसिध्द जम्मा जागरण गायक गोपालजी शर्मा यांचे होते.
नरेश बाबा यांचे आगमन भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सायंकाळी सुमारे ५ वाजता झाले आणि ७ वाजता या कार्यक्रमाची सुरवात झाली होती.

या कार्यक्रमाला आलेले कलाकार चित्रमय प्रदर्शन भक्तिमय वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे हे जन्मा जागरण सोहळा सादर करण्यात आला, कार्यक्रमाला आलेली मंडळी गोपालजींच्या सुमधुर आवाजाने उत्साहित झाले असुन श्री रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित जन्मसोहळा तसेच अनेक व्यमले,परचे ,सुगना बाईचा विलाप,भजनसंध्या,
नाचगणे, आदी आध्यत्मिक प्रसंग रंगीत तालीम नाट्य सादरीकरणाचा लाभ उपस्थित मंडळींना मिळाला.

कार्यक्रमाचे विषेश म्हणजे हा कार्यक्रम- सोहळा तेल्हारा तालुक्यामध्ये ४०वर्षांनंतर झालेला असे बोलले जात होते या कार्यक्रमाचे आयोजक माननीय महेशजी राठी (बेलखेडवाले) यांचे श्रेय असुन पुर्ण माहेश्वरी समाज बांधव राठी,पालीवाल,चांडक,गांधी, सह-परिवार,तसेच शेकडो गावकरी मंडळीनी अफाट संख्येत या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती, तसेच बाहेरुन आलेले ,बुलढाणा ,जळगाव, जामोद ,संग्रामपूर ,सोनाळा, पातुर्डा ,वरवट बकाल,माळेगाव बाजार,अंजनगाव,हिवरखेड, अकोट,अकोला 2 जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकानवरून अनेक गावांची मंडळी कार्यक्रमाला हजर होती, भागवत मंगल कार्यालयामध्ये चहा,नास्ता, जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था मिळाली. कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहात आणी जल्लोषात पार पडला.

Previous articleबळीराजा सुखावला शेतकरी दुखावला पावसाने दांडी मारल्याने पेरणी खर्च तब्बल 45 हजार रुपयांचे शेतकऱ्याचे अर्थिक नुकसान
Next articleपोदार जम्बो किडस पुर्व प्राथमिक शाळेची मुक्रमाबाद येथे सुरुवात .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here