Home नांदेड पोदार जम्बो किडस पुर्व प्राथमिक शाळेची मुक्रमाबाद येथे सुरुवात .

पोदार जम्बो किडस पुर्व प्राथमिक शाळेची मुक्रमाबाद येथे सुरुवात .

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0035.jpg

पोदार जम्बो किडस पुर्व प्राथमिक शाळेची मुक्रमाबाद येथे सुरुवात .
मुक्रमाबाद प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद येथे देशातील अग्रगण्य जवळ पास 94 वर्षे जुनी शैक्षणिक संस्था म्हणून नावारुपाला आलेली शेठ आनंदीलाल पोदार यांनी 1927 मध्ये या संस्थेचे रोपटे लावले आहे. पोदार शैक्षणिक संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राहिले आहेत.
जवळजवळ देशभरात या समुहाचे 136 शाखा आहेत व तसेच 180,000/- पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुक्रमाबाद शहरात यासारख्या नामवंत शाळेच्या शाखेची सुरूवात संचालिका सौ.विना सुरेश राचलवार यांनी केली.आपल्या सारख्या ग्रामीण भागात या नामवंत शाळेची सुरूवात होणे पालकांसाठी एक पर्वणी ठरु शकते.असे प्रतिपादन सप्तगिरी पोदार लर्न स्कुल देगलुर चे मुख्याध्यापक मा.श्री.शेकापुरे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
व तसेच या प्रसंगी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन चे स.पो.नि संग्रामजी जाधव साहेब , व मुक्रमाबाद नगरीचे प्रथम नागरीक सौ.अंजिता ताई बोधने व तसेच मुखेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.मा शिवराज पाटील कुंद्राळकर साहेब व तसेच प्राचार्य साहेब छ.शिवाजी क.महाविद्यालय मुक्र्माबाद व तसेच कै.भा.दे.क महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रा.खंदाडे सर व चन्नावार सर मा.श्री सुभाष अप्पा बोधने जेष्ठ समाजसेवक व मा.चेअरमन सुरेश सावकार पंदिलवार ग्राम पंचायत सदस्य बालाजी पसरगे यांचे मार्गदर्शन लाभले. व सुञसंचलन भाउसाहेब बनबरे व सौ सरोजा कॕदरकुंठे मॕडम यांनी केले व मा.श्री खंडागळे सर व सौअनिता.थळपत्ते मॕडम व सौ.खंडागळे मॕडम यांनी परीश्रम घेतले या प्रसंगी सर्व डाॕक्टर ॲसोशिएशन व सर्व पञकार बांधव व पालक वर्गाची उपस्थिती होती.

Previous articleश्री रामदेवबाबा जीवन आधारित भव्य-दिव्य जम्मा जागरण आयोजन
Next articleपुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here