Home बुलढाणा बळीराजा सुखावला शेतकरी दुखावला पावसाने दांडी मारल्याने पेरणी खर्च तब्बल 45 हजार...

बळीराजा सुखावला शेतकरी दुखावला पावसाने दांडी मारल्याने पेरणी खर्च तब्बल 45 हजार रुपयांचे शेतकऱ्याचे अर्थिक नुकसान

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220704-WA0001.jpg

बळीराजा सुखावला शेतकरी दुखावला

पावसाने दांडी मारल्याने पेरणी खर्च तब्बल 45 हजार रुपयांचे शेतकऱ्याचे अर्थिक नुकसान

युवा मराठा नयुज,वेब पोर्टल रविंद्र शिरस्कार,संग्रामपूर शहर

संग्रामपुर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत बसलेले आहेत
त्याकरिता अनेक जण मोबाइलच्या साह्याने बळीराया चे आगमन तपासत असतात,मिडियावर पावसाचे हजेरी पाहतात तर अनेक ठिकाणी शेतकरी दगडाच्या पान देवाची स्थापना करुन देवाला साकडे घालत बळीराजाला निमंत्रण देण्यात तल्लीन झालेले आहेत.

हजारो रुपये खर्च करुन अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली मांत्र पावसाअभावी पिके सुकू लागल्याचे चित्र दिसत आहे वरवट बकाल येथील शेतकरी अर्जुन महादेव डाबरे यांच्या काकडवाडा शिवारातील सहा एकर शेतीत संतापुन त्यांनी सहा एक्कर सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवून पूर्ण पीक नंष्ट केले आहे

जून महिन्यात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद,मूंग ,सोयाबीन ,व कापसाची पेरणी केली मांत्र संग्रामपूर तालुक्यात पावसाचा खंड पडल्यामुळे पिके वाळत नसल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे पावसाने दांडी मारल्यामुळे ह्या तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला आहे वरवट बकाल जवळील काकडवाडा शेती शिवारातील अर्जुन महादेव डाबरे या शेतकर्याने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन ,व तुरीची पेरणी केली होती पेरणीकरिता महागडे बियाणे खरेदी केले हाेते मांत्र पेरणी केल्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे पिके उगवली नसल्याने महादेव डाबरे यांनी पेरणी झालेल्या शेतात रोटाव्हेटर फिरविले वरवट बकाल येथील शेतकरी अर्जुन महादेव डाबरे या शेतकर्याचे जवळपास 45 हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे
जून महिन्यात मुबलक पाऊस झालेला नाही संग्रामपूर तालुक्यात खरीप हगामात ५० टक्के झाला परंतु पाऊस होईलचं या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरन्या केल्या मात्र त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे गत काही वर्षांपासून शेतकरीं वर्गांला वेगवेगळे संकटांना सामोरे जावे लागते, अस्मानी संकट येत आहेत मागील वर्षात सततधार पाऊस झाले,ऐनवेळी पीके कापणीला आलेली असतात, त्यामुळे मूग ,उडीद, सोयाबीन, कपाशीचे लगातार नुकसान झाल्याने शेतकरी भयभीत झालेले आहेत, शेतकरी हताश होऊन बसले आहेत.

Previous articleराज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसावर रुग्णांना फळवाटप तसेच रुग्णालयातील आवारात वृक्षारोपण
Next articleश्री रामदेवबाबा जीवन आधारित भव्य-दिव्य जम्मा जागरण आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here