Home बुलढाणा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसावर रुग्णांना फळवाटप तसेच रुग्णालयातील आवारात वृक्षारोपण

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसावर रुग्णांना फळवाटप तसेच रुग्णालयातील आवारात वृक्षारोपण

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0024.jpg

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसावर रुग्णांना फळवाटप तसेच रुग्णालयातील आवारात वृक्षारोपण                                                         संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश ,उर्फ बच्चू कडू ,पालकमंत्री तथा राज्यमंत्री अकोला यांचा वाढदिवस 5 जुन ला सर्वत्र ठिकाणी साजरा करण्यात येतो त्यांच्या या वाढदिवसानिमित्य संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये प्रहार जनशक्ती च्या कार्यकर्त्यां मार्फत निंबाचे,निलगिरीचे तसेच वेगवेगळ्या झाडांचे रोपटे लावण्यात आले आहेत या कार्यक्रमामध्ये ग्रामीण रूग्णालय संग्रामपूर येथील कर्मचारी मंडळींनी भाग घेतला होता यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संग्रामपुर तालुका ‘उपाध्यक्ष , तौसीफ जमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पंकज पाटकर ,दीपक बोयाखे, ताबिश पटेल, राजू मुल्ला,अक्षय अवचार, संदीप सोळंके,दिनेश इंगळे, प्रहार जनशक्ती चे तालुक्यातील कार्यकर्ते या वेळी तेथे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ग्रामीण रूग्णालय वरवट बकाल येथील डायलेसिस रुग्णांना फळ वाटप करण्यात आले ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोमासे, डॉक्टर उमेश भाऊ चक्रे,अर्चना मॅडम, रवी सोळंके, यासीन शेख ,साजिद शेख ,शेख मोहसीन,शेख ,डॉक्टर तायडे व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here