Home नांदेड प्रेस संपादक संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस विविध...

प्रेस संपादक संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0032.jpg

प्रेस संपादक संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

लोहा-प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड, जिल्हा सरचिटणीस हरजिनदार सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांचा वाढदिवस लोहयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
लोहा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप व डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान–
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांच्या व पत्रकारांच्या उपस्थितीत केळी,सफरचंद फळे वाटप करण्यात आले.तसेच यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जाधव,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश राठोड,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.पूर्वा सरकार यांसह सर्वांचा डॉक्टर डे दिनानिमित्त पुष्पहार घालून शिवराज पाटील पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक पत्रकार संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा – कंधार विधानसभा प्रमुख तथा पत्रकार विलास सावळे, ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, कार्याध्यक्ष तथा सकाळ चे पत्रकार बापू गायकर, तालुका उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव मारोती चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख शिवराज दाढेल, सहसचिव टी.के.दाढेल, कोषाध्यक्ष पत्रकार रमेश पवार, छायाचित्रकार विनोद महाबळे, प्रेरक संघटनेचे सोनकांबळे चिखलभोसीकर आदी उपस्थित होते.
तसेच शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धावरी येथील जि.प. प्रा.शाळेला आंब्याचे वृक्ष भेट देऊन फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी.वाय. चव्हाण,सहशिक्षक आर.पी.पवार,सहशिक्षिका सौ.एल. व्ही. जोशी, सहशिक्षक एस.बी. घोडके,संजय तेललवार, गोवर्धन चव्हाण, प्रेरक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पि.आर. चिखलभोसीकर आदींची उपस्थिती होती.
अनेक मान्यवरांच्या वतीने सत्कार
प्रेस संपादक पत्रकार संघाचे लोहा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल पुष्पहार घालून पेढा भरवून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक करिम शेख,स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा-कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे,सचिन मुकदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवराज पाटील पवार,बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक केशवराव शेटे , ओमप्रकाश सोनवळे,कदम व त्यांच्या स्टाफ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे प्रदीप हटकर, सुर्यकांत दाढेल, विनायक सेवनकर यांनी तर लोहा येथील पत्रकार विजयकुमार चन्नावार, जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार,डि.एन.कांबळे, जगदीश कदम,गोविंद कदम,बाळासाहेब कतूरे, गोविंद वड,तसेच पारडीचे मा.सरपंच दिगांबर पाटील डिकळे,व्यंकट आळणे, जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सर्जेराव टेकाळे,बा.पु.गायकर,पि.डी.पोले,अवधुतवार,आचणे, शिक्षक क काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा शिक्षक नेते विठू भाऊ, चव्हाण,अनंत चव्हाण,सुधाकर पाटील पवार,अंकुश पाटील कदम कृउबास सदस्य, संपादक अजित पाटील,यज्ञात कोल्हे, संजय चव्हाण, विष्णू आंबेकर,अशोक चव्हाण,राम लिंबोटकर,यांच्या सहित अनेक मान्यवरांनी अभिष्टचिंतन दिनी व्हाट्सअप,फेसबुक, विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here