Home जळगाव चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव

चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240116_204345.jpg

चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा व आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालु्नयातील खेळाडुंयाठी चाळीसगाव येथे नमो चषक 2024 भव्य क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कब्बड्ढी, कुस्ती, सामूहिक भजन व भक्तीगीत गायन स्पर्धा, बुध्दीबळ आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत.या सर्व स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे रंगणार आहेत.
त्यात शुक्रवार दि.19 रोजी महिला व पुरूष गटांसाठी कब्बडी स्पर्धा होणार आहे. सकाळी 9 वाजेपासून या स्पर्धा सूरू होतील. तर रविवार 21 जानेवारी रोजी कुस्तीचे सामने रंगतील. पुरूषांच्या 40, 45, 50,57, 65, 74, 86,91, 97 किलो गटात तर महिलांच्या 36,41,46,50,53, 57,62, 68 किलो गटात स्पर्धा होणार आहेत.या कुस्ती स्पर्धा मॅटवर होणार आहेत.सायंकाळी 5 वाजेपासून स्पर्धा सुरू होतील.
सोमवार दि.22 जानेवारी रोजी सामुहिक भजन व भक्तीगीत गायन स्पर्धा (अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा) होतील. सायंकाळी 5 वाजेपासून या स्पर्धा होतील. महिला आणि पुरूष स्वतंत्र गट असतील. शुक्रवार 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून 14 वर्षाआतील लहन गट व 14 वर्षावरील खुला गट(मुले, मुली एकत्र)बुध्दीबळ स्पर्धा आयोजीत केली आहे. स्पर्धेला सकाळी 9 वाजता सुरूवात होईल.
रविवार 28 जानेवारी रोजी 15 वर्षाआतील व वरिष्ठ गट यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. त्यात राम मंदिर ते राष्ट्रमंदिर, विकसीत भारताचा मेादी गॅरंटी, मला आवडलेले मंगेशदादा हे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेला सायंकाळी 6 वाजेपासून सुरूवात होईल.
या सर्व स्पर्धांमध्ये भरपूर बक्षिस असून नमो चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात नाव नोंदणी करणे आवश्यक राहील. प्रत्येक सहभागी स्पर्धकास आकर्षक सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleभंगार विक्रेत्याकडून चाळीसगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Next articleदेगलुर मधे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जिजाऊ चरित्रावर भव्य कीर्तन सोहळा संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here