Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार

गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार

93
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_184338.jpg

गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार

४ सदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्याचे क्रीडामंत्री नामदार संजयजी बनसोडे यांचे आदेश

गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा  रद्द करण्यासंदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागणीवरून विधानभवनात बैठक संपन्न

बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुलांना प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्याचे दिले निर्देश

कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल करण्यात आल्याचा आमदार डॉ देवरावजी होळी यांचा गंभीर आरोप

नागपूर,(सुरज गुंडमवार ब्यूरो चीफ)-

गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम  निकृष्ट दर्जाचे असुन व  बांधकाम अतिशय संथ गतीने होत आहे  त्यातच कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी  संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याचा गंभीर आरोप आमदार डॉ देवरावजी होळी यांनी क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत केले असता या सर्व प्रकरणाची चौकशी ४ सदस्य समितीच्या मार्फत करून ८ दिवसाच्या कालावधीत त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री ना.संजयजी बनसोडे यांनी विधानभवनातील झालेल्या बैठकीमध्ये सचिवांना दिले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागणीवरून गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा  रद्द करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी विधान भवनातील उपसभापती यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन केले .

१ जून २०२३ पासून  दररोज ५ हजार रुपये दंड रक्कम   ठोठावूनही  कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही पत्राचे पालन करण्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटदाराला फक्त कामे करण्यात व निकृष्ट दर्जाची कामे करण्यात रस असून जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ साठीही त्यांनी अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कंत्राटदादाला काळया यादीसाठी नोटीस बजावलेली आहे.  त्यातच या कामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची बाब निदर्शनास आली असल्याची माहिती आमदार महोदयांनी बैठकीत दिली असता सदर प्रकरणाची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
मा.मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह क्रीडा विभागाचे सचिव, आयुक्त क्रिडा व युवक सेवा पुणे, संचालक क्रीडा व युवक कल्याण, कार्यकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली, वास्तु विशारद क्रीडा संकुल बांधकाम समिती गडचिरोली, जिल्हा क्रीडा संकुलाचे कंत्राटदार यांचे सह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपूर्वरत सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी द्या –भावेश कोटांगले
Next articleविकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते पिंपळगाव येथे शुभारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here