Home Breaking News 🛑 मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा…! ७ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत…..! उध्दव ठाकरेंची गर्जना...

🛑 मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा…! ७ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत…..! उध्दव ठाकरेंची गर्जना 🛑

88
0

🛑 मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा…! ७ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत…..! उध्दव ठाकरेंची गर्जना 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕ मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे..

अशी डरकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोडली. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपेतर ७ मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

बैठकीच्या सुरूवातीलाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोरोना उपाययोजनांचं कौतुक केलं. आपण कोरोना संकटात खूप चांगलं काम करत असल्याचं ममतादीदी उद्धव ठाकरेंना म्हणाल्या. यावर मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा असल्याचं उद्धव ठाकरेंनी अभिमानाने सांगितलं.

आपण विरोधी पक्षांनी लढलं पाहिजे. घाबरून चालणार नाही.

आपत्ती आली की आपण एकत्र येतो, चर्चा करतो. आपण आपत्तीची वाट कशाला बघायला हवी? आपत्ती देखील आपल्याला घाबरून राहायला हवी. हे एकत्रच आहेत, असं तिला वाटायला हवा. आपण गप्प राहायचं की लढायचं… हे ठरवायला हवं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जीएसटी परताव्याचा मुद्दा उपस्थित करत केंद्राने हे पैसे लवकरात लवकरत दिले पाहिजेत तसंच कोरोना काळात केंद्राकडचे पीपीई कीट तसंच व्हेंटिलेटर मिळत राहायला हवेत, अशी अपेक्षा उद्धव यांनी या बैठकीत व्यक्त केली….⭕

Previous article🛑 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता द्यावे लागणार १०० रुपये…! UIDAI ने दिली माहिती 🛑
Next article*सुरगाण्यातील भिवतास धबधबा बनला पर्यटकांचा केंद्रबिदू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here