• Home
  • 🛑 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता द्यावे लागणार १०० रुपये…! UIDAI ने दिली माहिती 🛑

🛑 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता द्यावे लागणार १०० रुपये…! UIDAI ने दिली माहिती 🛑

🛑 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता द्यावे लागणार १०० रुपये…! UIDAI ने दिली माहिती 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली ⭕आधार कार्डवर फोटो अपडेट करणे महाग झाले आहे. आता फोटो अपडेशनसाठी 100 रुपये फी असेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) बायोमेट्रिक अपडेट फीमध्ये ५० रुपयांची वाढ केली आहे. आतापर्यंत अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क निश्चित केले गेले होते. ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे की, बायोमेट्रिक्स अपडेटसह आता एक किंवा अधिक अपडेट्ससाठीची फी १०० रुपये असेल. सध्या UIDAI आधारमध्ये डेमोग्राफिक डिटेल अपडेटसाठी ५० रुपये घेते.

या सेवांचे शुल्क वाढले
आधार सेवा सुरू होताच बायोमेट्रिक अपडेशनसाठीची फी वाढली आहे.

डेमोग्राफिक अपडेशनच्या फीमध्ये वाढ झाली नाही. डोळ्याच्या बाहुल्या (आयरिस) आणि फिंगरप्रिंट्ससुद्धा अपडेट केल्या आहेत. फिंगरप्रिंट न मिळाल्यास एखाद्या व्यक्तीला पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करावे लागते. यासाठी फी १०० रुपये करण्यात आलेली आहे, तर नाव, पत्ता, वय, मोबाइल नंबर आणि ई-मेलसाठी पूर्वीप्रमाणेच ५० रुपये द्यावे लागतील.

UIDAI ने म्हटले आहे की अर्जाचा फॉर्म आणि फी सोबतच आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करावी लागतील. UIDAI ओळखपत्र म्हणून ३२ कागदपत्रे स्वीकारतो.

अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून ४५ कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आपल्या आधारमधील तपशील बदलण्यासाठी आपण कोणताही एक वैध पुरावा सादर करू शकता.

आधारमधील सर्व बदलांसाठी, आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. आपण कोणतेही कागदपत्र सादर न करता आधार कार्डमध्ये आपला मोबाइल नंबर अपडेट करू शकता.

आपण आपला नवीन फोटो कोणत्याही दस्तऐवजासह अपडेट करू शकता. बायोमेट्रिक्स, लिंग आणि लिंग आयडी सारख्या इतर गोष्टींमध्ये कोणतीही समस्या न घेता अपडेट केले जाऊ शकते…⭕

anews Banner

Leave A Comment