• Home
  • 🛑 बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब….! नागपूरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत 🛑

🛑 बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब….! नागपूरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत 🛑

🛑 बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब….! नागपूरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत 🛑
नागपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ नागपूर शहरातील बससेवा साडेचार महिन्यांपासून बंद आहेत . बसेस बंद असल्यामुळे ५० टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. बसेस बंद असल्याने शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मोठं नुकसान बसेसचे झालं आहे. शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत..

साडेचार महिन्यांपासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका नागपुरातील बस सेवेला बसला आहे.

लॉकडाऊनमुळे बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पुणे महानगर परिवहन मंडळावरही आर्थिक संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएल बस सेवेला १०० कोटींचे नुकसान झाले आहे. पीएमपीएमएलची सेवा सलग ६७ दिवस बंद होती. त्यामुळे हे नकुसान झाले आहे.

पीएमपीएमएलचे दररोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी ६० लाखांपर्यंत होते. तर दरमहा 45 ते ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण १७ मार्चपासून पीएमपीएमएल सेवा बंद असल्यामुळे पीएमपीएमएल विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील फक्त १०० बसेस सुरु आहेत.

पुणे, पिंपरीत ३ सप्टेंबरपासून बससेवा सुरु होणार असल्याचे माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ य़ांनी दिली. बसे सेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.

नुकतेच वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात आले. राज्यातील बसेस सुरु कराव्यात तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत हे आंदोलन करण्यात आले होते.⭕

anews Banner

Leave A Comment