• Home
  • 🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑

🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑

🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं कळतं. खबरदारीचा उपाय म्हणून मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला नवं नाही. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. मांजरेकर यांना बुधवारी (२६ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने ३५ कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे.

हा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचं कळतं. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबी पोलीस लवकरच शोधून काढतील….⭕

anews Banner

Leave A Comment