Home पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या सासवडला जाहिर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या सासवडला जाहिर सभा

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0010.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे                                                    मुख्यमंत्री शिंदे साहेबांची उद्या सासवड मध्ये जाहीर सभा नाट्यमयरित्या राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तना नंतर मुख्यमंत्री झालेल्या श्री एकनाथ शिंदे साहेबांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा मंगळवारी दि 2 सासवड तालुका पुरंदर येथे होणार असल्याची माहिती माजी मंत्री श्री विजय बापू शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ गुंजवणी प्रकल्प फुरसुंगी उरुळी पाणी योजना हवेलीतील गावांचा आवाजावी टॅक्स आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार अशा विविध मुद्द्यांची या सभेत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे सभेला मुख्यमंत्री यांच्यासोबत शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणारे श्री गुलाबराव पाटील तसेच गुवाहाटी फेम आमदार शहाजी पाटील खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील असे दिग्गज उपस्थित राहणार आहेत असेही शिवतरे यांनी सांगितले मंगळवारी होणारी सभा ही मोठ्या पालखीतळ मैदानावर होणार आहे या मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे मधल्या काळात सासवड पालिकेने हे मैदान सभांसाठी देण्यासाठी बंद केले होते उद्धव ठाकरे साहेबांची भव्य सभा याच मैदानावर झाली होती काय झाडी काय डोंगर आणि काय ते हॉटेल डायलॉग फेम शहाजीबापू पाटील यांचे भाषण ऐकायला पुरंदर हवेलीत मोठा उत्साह दिसून येत आहे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील हेदेखील उद्या मैदान गाजवणार अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here