Home माझं गाव माझं गा-हाणं ताहराबाद परिसरात रोगराई फवारणी तर विविध विकास कामांची महत्त्वाची मागणी ..ताहराबाद परिसर...

ताहराबाद परिसरात रोगराई फवारणी तर विविध विकास कामांची महत्त्वाची मागणी ..ताहराबाद परिसर वार्तापत्र..

290
0

राजेंद्र पाटील राऊत

ताहराबाद परिसरात रोगराई फवारणी तर विविध विकास कामांची महत्त्वाची मागणी ..ताहराबाद परिसर वार्तापत्र.. सटाणा(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रोग प्रतिबंधक फवारणी करण्यात आली.सध्या गावात विविध साथीचे आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने तत्काळ ट्रॅक्टरच्या फवारणी यंत्राद्वारे गावात फवारणी करण्यात आली.

ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने रोग प्रतिबंधक फवारणी सुरू करतेवेळी उपसरपंच सीताराम साळवे,योगेश नंदन,ग्रामपंचायत सदस्य निखिल कासारे,जीवन माळी,राजेश माळी,अजय सोनवणे,महेश साळवे.
गेल्या दोन वर्षापूर्वी मोसम नदीस आलेल्या पुरात अंतापुर – दसवेल रस्त्यांवरील असलेल्या पुलाची मोठी पडझड झाली मात्र या पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने सदर काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे अशी मागणी होत आहे.
अंतापुर – दसवेल या रस्त्यावर अंतापुर गावाजवळून वाहणाऱ्या मोसम नदीवर असलेल्या पुलाची नदीस दोन वर्षापूर्वी आलेल्या पुरात मोठी पडझड झाली.यात चक्क दोन मोरींची पडझड झाली होती.
स्थानिक ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी भराव करून रस्ता वापरायला सुरुवात केली असली तरी नदीला पाणी वाढल्यास पुलाच्या रस्त्याला केलेला भराव कधीही वाहून जाण्याचा धोका आहे.यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो.पुलाच्या खालच्या बाजूला बंदारा बांधलेला आहे याची उंची वाढविण्याचे काम नुकतेच झाले आहे यामुळे येथे कायम पाणी असते बंधाऱ्याची उंची वाढविल्याने पाणी साठवण क्षमता वाढली आहे.या ठिकाणी असलेल्या पाण्याचा व नदीला येणाऱ्या पुराचा विचार करून पुलाचे काम होणे काळाची गरज बनली आहे.या पुलाचे काम तत्कालीन मंत्री स्वरुपसिंग नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने झाले होते.यामुळे अंतापूर येथील तीर्थक्षेत्र दावल मलिक बाबा यांचे देवस्थान येथे प्रत्येक गुरुवारी येणाऱ्या हजारो भाविकांची मोठी सोय झाली.या पुलामुळे अंतापुर येथून तीर्थक्षेत्र मांगीतुंगी,द्वारकाधीश साखर कारखाना,दसवेल,पिंपळनेर,शेवरे भागाशी संपर्क सोयीचा व सोपा झाला.मात्र दोन वर्षापूर्वी मोसम नदीस आलेल्या पुरामुळे पुलाची पडझड झाली.त्याची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी झाली असल्याने सदर पुलाचे भक्कम काम व्हावे अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
अंतापुर – दसवेल मोसम नदीवरील पुलाची भक्कम दुरुस्ती होणे काळाची गरज आहे. दावल मलिक बाबा देवस्थान येथे दर गुरुवारी येणाऱ्या हजारो भाविकांचा तसेच या पुलाशी जोडल्याषे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार लक्षात घेऊन सदर काम युद्ध पातळीवर करणे गरजेचे बनले आहे.
सचिन कोठावदे
प्रवक्ता,नाशिक जिल्हा कॉंग्रेसबागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र नरकोळ येथे जाणाऱ्या मुंगसे फाट्या पासून रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून,सदर रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मुंगसे फाटा – श्रीक्षेत्र नरकोळ येथील आशापूरी माता मंदिर रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. साईड पट्टया नाहीश्या झाल्या आहेत.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालविणे जिकरीचे होत आहे.आता पावसाळा सुरू झाला आहे यामुळे रस्ता होत्याचा नव्हता झाल्या शिवाय राहणार नाही.कारण आजच रस्त्यावर डांबर कमी प्रमाणात शिल्लक आहे.या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते.यामुळे रस्त्याची अवस्था अधिक खराब होणार आहे. जाखोड, बंदार पाडा,आशापूरी माता मंदिर पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था कमी होण्या बरोबर रस्त्यावर काही ठिकाणी फरची,पुल,संरक्षण भिंत करणे गरजेचे बनले आहे.रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यामुळे प्रशासनाने याकामी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पिंपळनेर रस्त्यावरील मोसम नदीवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाळा सुरू झाल्याने पुलावरील रस्त्याची आवस्था अधिकच खराब झाली असल्याने वाहनधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या ताहाराबाद- पिंपळनेर व ताहाराबाद- सटाणा दरम्यान रस्त्याचे काँक्ट्रिटीकरण काम सुरू आहे.या कामातच पुलाच्या काम येते मात्र संबंधितांनी पुलाच्या कामाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचे जाणवते आहे.यामुळे रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते आहे त्यात पुलावरील रस्त्याची दुरवस्था म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती तयार झाली आहे. वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुलावरील रस्त्याची व पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे यांनी केली आहे. सोमपूरला अधिकाऱ्यांची भेट
बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीला विविध अधिकारी वर्गाने भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली. विकासासाठी गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शासन स्तरावरून येणारी प्रत्येक योजना गावात राबविली गेली पाहिजे त्यातूनच गावाची उन्नती घडून येईल शेवटच्या स्तरापर्यंत शासनाच्या विकास योजना पोहोचतील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल होईल.
सोमपूर गावाचे भूमिपुत्र माननीय गटविकास अधिकारी महेश पाटील त्यांचे समवेत मॅजिस्ट्रेट (जज) संदीप पवार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी, नंदुरबार चे पोलीस उप अधीक्षक सचिन हिरेे, मालेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद शिरोदे,उद्योजक संदीप मांडवडे,लेखापाल विष्णू वारुंगसे या सर्व अधिकाऱ्यांनी सोमपूर गावाला भेट दिली यावेळी ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सरपंच सुनीता गायकवाड,उपसरपंच समाधान मोरे, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे माजी अध्यक्ष गिरीश भामरे,तंटामुक्ती अध्यक्ष दीपक भामरे माजी सरपंच प्रकाश भामरे, सचिन कैलास भामरे,उखाजी पाटील, पोलीस पाटील महेंद्र भामरे,विजय नहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे, केशव सोनवणे, संभाजी भामरे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here