Home नांदेड शेळगांव (गौरी) च्या सरपंचाकडुन शेतकऱ्यांसाठी पीकविमा आँनलाईन केली मोफत सुविधा..

शेळगांव (गौरी) च्या सरपंचाकडुन शेतकऱ्यांसाठी पीकविमा आँनलाईन केली मोफत सुविधा..

211
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगांव (गौरी) च्या सरपंचाकडुन शेतकऱ्यांसाठी पीकविमा आँनलाईन केली मोफत सुविधा..
माधवराव घाटोळे नायगाव तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगांव

राज्यातील आदर्श गांव शेळगांव (गौरी) येथे पीकविमा भरुन घेणे चालु आहे.गेल्यावर्षी पासुन कोरोनानी थैमान घातलेले आहे.कोरोनाचा जोर सद्या थोडाफार कमी झाला आसला तरी धोक आनखी टळला नाही हि बाब लक्षात घेऊन शेळगांव गौरी येथील नवनिर्वाचित सरपंच प्राचार्य डाँ .मनोहर तोटरे यानी गावातील शेतकरी बांधवानी बाहेर इत्तर ठिकाणी जाऊन गर्दीत जाऊन प्रधानमंत्री पीकविमा भरताना कोरोना बांधीत होऊ नये या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने पीकविमा आँनलाईन करुन देण्याचा निर्णय घेतला आसल्याचे सरपंच तोटरे सर यानी सागितले.

शेळगांव गौरी येथील ग्रामपंचायत मध्येच गावातील शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीकविमा भरताना गावकर्याना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.शेळगांव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सुनिल रामदासी व सदस्य संतोष देशमुख यानी स्वंघोषना (पीकपेरा ) फाँम मोफत वाटप केले.

8 जुलै ते 15 जुले पर्यत गावातील सर्व शेतकऱ्यांचा आँनलाईन फाँम भरुन घेणार आहे.आतापर्यंत 150 शेतकऱ्यांनी या सुविधाचा लाभ घेतला आहे,ग्रामपंचायत मध्ये सत्तातंर झाल्यापासून गावात विकास कामाचा सपाटा चालु आहे.पीकविमा मोफत सुविधा गावातच मिळत आसल्याबद्दल गावातील नागरिकांनी सरपंच.उपसरपंच.व ग्रा.सदस्य.चेअरमन व सदस्य याचे आभार व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here