Home नाशिक अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

113
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_201821.jpg

अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे 

वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सदैव अग्रस्थानी असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे
राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले (डिकसळकर) यांच्या आदेशानुसार व जनार्दन महाराज काकडे (राज्य पदाधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय वारकरी मंडळाची नासिक विभागीय अध्यक्ष रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ (आहेरगाव) यांच्या अध्यक्षतेखाली नासिक जिल्हा अध्यक्ष धर्माचार्य निवृत्ती बाबा रायते (खडक माळेगाव) यांच्या कुशल नियोजनात रामायणाचार्य जनार्दन महाराज काकडे संस्थापक वारकरी शिक्षण संस्था चुंचाळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात साधक वादक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय वारकरी मंडळाची नासिक जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर वनसगाव यांनी दिली आहे.
यावेळी व्यासपीठावर सह जिल्हाध्यक्ष महंत संजय दास जी महाराज शिंदे कानमंडाळे, सह जिल्हाध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ कोटमगाव, ह भ प बापू महाराज पवार मालेगाव ,ह भ प माधव महाराज काजळे नांदूर वैद्य इगतपुरी ,हभप नितीन काका चौधरी ओझर, भागवताचार्य ह भ प कविताताई पगार लखमापूर ,हभप प्रतिभा सोनवणे सिन्नर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत राज्य पदाधिकारी ह भ प जनार्दन महाराज काकडे यांनी बैठकीचे नियोजन संदर्भात अखिल भारतीय वारकरी मंडळाची दिशा ध्येय धोरणे उद्दिष्टे याबाबत सखोल माहिती दिली. अखिल भारतीय वारकरी मंडळाची नाशिक जिल्हा अध्यक्ष धर्माचारी ह भ प निवृत्ती बाबा रायते यांनी नियुक्ती व जबाबदारी याबाबत साधक-बाधक चर्चा करून वारकरी संप्रदायाची दिशा ध्येय धोरण आपण जो परमार्थ करतो ती सेवा ती सेवा करताना आपण निस्वार्थपणे केली तर निश्चितच परमार्थ घडतो असे सांगताना त्यांनी गत तीन वर्षांपूर्वी कोरोना काळातही अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी 15 तालुक्यांमध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका कार्यकारणी पदाधिकारी नियुक्ती सोहळा अतिशय थाटामाटात संपन्न केला असून कोरोना काळातही आपण केलेले परमार्थ वाया जात नसल्याचे सांगितले , कारण कोरोना काळातही 15 तालुक्यात फिरून कार्यक्रमाचे नियोजन करताना परमेश्वराच्या कृपेने कोणालाही कोरोना झाला नाही हीच खरी भगवंताची कृपा असल्याचे त्यांनी यावेळी विशेष करून सांगितले. तसेच अशुद्धता घालविण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्य जोमाने यापुढे सुरू राहील असे महंत संजय दास महाराज शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ह भ प बापु महाराज पगार यांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन दिलेली जबाबदारी निष्ठेने केली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्ष भाषणातून रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ यांनी परमार्थ आणि परोपकार यावर सखोल चिंतन मांडताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून आपण सर्वांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा असे ही त्यांनी यावेळी उद्बोधन केले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीच्या व तालुका कार्यकारिणी च्या मुख्य पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी मालेगाव तालुका अध्यक्ष योगेश महाराज जगताप, निफाड तालुका अध्यक्ष सुनील महाराज जाधव, किशोर महाराज आहेर, येवला तालुका अध्यक्ष भाऊलाल महाराज काकड,वैभव नाना लोंढे, रावसाहेब सोनवणे, निंबाभाऊ पगार,भागवताचार्य हभप सौ कविताताई पगार, हभप सौ प्रतिभा सोनवणे, हभप सौ शितलताई तुपे, सौ सविता चव्हाण, सौ रेखा वायचळे, सौ आशालता भडजिरे,सौ स्वाती राऊत,सौ कल्पना जाधव,सौ मंगल देवरे, कृष्णा महाराज वाघमारे, धर्मराज चौधरी, नरेंद्र गायकवाड, प्रभाकर भडांगे, सोमनाथ आहेर,सुरेश गंगाधर चिमणपुरे, पुंडलिक काशिनाथ आहेर, सुभाष नारायण अहिरराव, पोपट धोंडु आहेर, दादाजी केदा आहेर, कारभारी पंडीत आहेर, आप्पा महाराज नाळेकर, रविंद्र महाराज देसले आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमहिला भारत देशाच्या विकासाचा महत्त्वाचा स्तंभ-
Next article, 11 मार्चला पोलीस भरती विद्यार्थ्यांचा मुंबई मंत्रालयावर मोर्चा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here