Home गडचिरोली अखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय आमदार डॉ देवरावजी होळी...

अखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

142

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0031.jpg

अखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार

जून ते ऑक्टोंबर २०२२ कालावधीतील अतिवृष्टी ,पूर , नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली होती किमान २ वेळच्या नुकसानीच्या मदतीची मागणी गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राज्यात आलेल्या जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर, वादळ वारा ,नैसर्गिक आपत्ती, यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले अशा नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची मदत यापूर्वीच्या देण्यात येणाऱ्या मदतीपेक्षा दुप्पट करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याबद्दल आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

राज्य सरकारने याबाबत दिनांक २२ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून मदती संदर्भात संबंधित विभागाला आदेश दिलेले आहे

या मदतीमध्ये जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी यापूर्वी दर हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत होती ती आता १३ हजार ६०० रुपये करण्यात आली आहे. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी दर हेक्टरी १३ हजार ५०० होती ती आता २७ हजार रुपये करण्यात आली आहे. बहुवार्षिक पिकांच्या मदतीसाठी १८ हजार रुपये होती ती आता ३६ हजार करण्यात आली आहे.

राज्यात ३ वेळा महापुराची स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये कमीत कमी दोन नुकसानीच्या विचार करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली होती या मदतीमुळे शेतकऱ्यांना दुपट मदत मिळणार असून त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहे.

Previous articleहज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. श
Next articleथोर महापुरुषांचे विचार पुढील पिढीला रुजावे – डॉ. सतिश भाऊ वारजुकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.