Home जळगाव विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते...

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते पिंपळगाव येथे शुभारंभ

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_184911.jpg

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते पिंपळगाव येथे शुभारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने
दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी पिंपळगाव ता. चाळीसगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला.
विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. या लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मार्गदर्शनाचा लाभ उपस्थीतांनी घेतला. यावेळी खासदार उन्मेशद पाटील यांच्या हस्ते सरपंच जिजाबाई भिल्ल, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, माजी सभापती दिनेश बोरसे,
उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सरपंच संतोष देशमुख आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.
खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात *भारत सरकार* च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने एप्रिल-मे 2018 या कालावधीत
ग्रामस्वराज्य अभियान तसेच जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम
केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून आज पिंपळगाव ता. चाळीसगाव येथून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार असून श्रीफळ वाढवून रथाचे पूजन केले.
गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक सरपंच संतोष देशमुख तर सूत्रसंचालन व आभार गोरख राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला बंधू भगिनी ग्रामस्थ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते भारत आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.
सरपंच जिजाबाई भिल्ल यांनी पी एम विश्वकर्मा योजनेच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गरजू महिलेला उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन देऊन योजनेचा लाभ वितरीत करण्यात आला.

Previous articleगडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी समिती करणार
Next articleचाळीसगावात घरासमोरून इनोव्हा कार चोरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here