आशाताई बच्छाव
नांदेड जि.प. चा मनमानी कारभार माळेगाव यात्रा नियोजन बैठकीला आ.मोहन अण्णा हंबर्डे यांना डावलण्याचा प्रताप ! श्रीनिवास मोरे यांनी केला धिक्कार !!
लोहा/प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार
नांदेड जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार माळेगाव यात्रा नियोजन बैठकीत आ. मोहन अण्णा हंबर्डे यांना डावलण्याचा केला प्रताप जि.प. प्रशासनाचा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केला धिक्कार.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या व लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडेरायाची माळेगाव यात्रा येत्या १० जानेवारी पासून सुरू होणार असून यंदा याकरिता नांदेड जिल्हा परिषदेने यात्रा पुर्व नियोजन बैठक दि.१६ डिसेंबर रोजी घेतली पण नांदेड दक्षिणचे आ मोहन अण्णा हंबर्डे यांना या बैठकीला निमंत्रित केले नाही लोहा तालुक्यात ,लोहा पं.स. व नांदेड जि.प. अंतर्गत नांदेड दक्षिण मधील सोनखेड जि.प. सर्कल, शेवडी पं.स.गण, शिवणी जामगा, कारेगाव, खडकमांजरी, आंबेसांगवीचे, झरी,जानापुरी, बामणी, पांगरी,सायाळ, आदी ३२ गावे येतात त्यामुळे लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा नियोजन बैठकीला राज्य विधीमंडळाचे सदस्य नांदेड दक्षिण व लोहा मतदार संघाचे आमदार म्हणून काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांना जि.प. प्रशासनाने बैठकिस बोलावून निमंत्रीत करुन त्यांच्या सुचना ऐकायला पाहिजे होते . नांदेड जि.प.त जवळपास ५० ते ६० वर्ष प्रशासकराज लागेपर्यंत काँग्रेसची सत्ता होती शासनाने आता नांदेड जि.प.व पं.स वर प्रशासक राज लादले असुन या प्रशासक काळात जि.प.चा कारभार ढेपाळला आहे.
जि.प. प्रशासन कुणाच्या हातचे कटपुतळी भावले बनले आहे . राज्यात सत्तांतर झाल्यामुळे व जि.प. व पं.स.त प्रशासक राज असल्यामुळे प्रशासनाने प्रोटोकॉल पाहून माळेगाव यात्रा नियोजनाच्या बैठकीला आ. मोहन अण्णा हंबर्डे यांना निमंत्रित केले पाहिजे होते पण त्यांना या बैठकीला बोलाविले नसुन ही बाब खेदजनक आहे या बाबीचा आम्ही धिक्कार करुन नांदेड जि.प.व लोहा पं.स.चा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांनी सांगितले सदरील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,






