Home जळगाव चाळीसगावात घरासमोरून इनोव्हा कार चोरी

चाळीसगावात घरासमोरून इनोव्हा कार चोरी

238

आशाताई बच्छाव

IMG_20231218_185417.jpg

चाळीसगावात घरासमोरून इनोव्हा कार चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरातील शाहू नगरमधून घरासमोरून 8 लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार चोरीस गेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजीपाला विक्रेते मुकेश बापुराव चौधरी रा.शाहू महाराज नगर, गजानन महाराज मंदिर जवळ चाळीसगाव यांच्या मालकीची सुमारे 8 लाख रूपये किंमतीची एम एच.19 डी ए. 2777 ही पांढऱ्या रंगाची टोयाटो कंपनीची इनोव्हा कार घराच्या बाहेर लावलेली असताना दि.17 रोजी रात्री 9 ते सोमवार दि 18 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे
ते मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांना कार जागेवर दिसून आली नाही. त्यांनी कारचा आसपास शोध घेतला पण कार कुठेच आढळून आली नाही.
मुकेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स पो नि दिपक बिरारी करीत आहेत.

Previous articleविकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते पिंपळगाव येथे शुभारंभ
Next articleचाळीसगावातून दोन सख्खे भाऊ बेपत्ता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.