Home नांदेड देगलुर मधे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जिजाऊ चरित्रावर भव्य कीर्तन सोहळा संपन्न.

देगलुर मधे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जिजाऊ चरित्रावर भव्य कीर्तन सोहळा संपन्न.

124
0

आशाताई बच्छाव

IMG_20240116_205205.jpg

देगलुर मधे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जिजाऊ चरित्रावर भव्य कीर्तन सोहळा संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

जिजाऊ जन्मोत्सव 2024 निमित्त देगलुर येथे झी टॉकिज फेम ह भ प वनिता ताई पाटील मुंबई यांचा जिजाऊ चारित्रावर कीर्तनाचा सोहळा जिजाऊ ब्रिगेड द्वारे दि. 14 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आला .सुरुवातीला माँ जिजाऊ पुजन , दिप प्रज्वलन करून डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देऊन, अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात झाली .वेळी मंचावर प्रणिता ताई चिखलीकर / देवरे , मिनलताई पाटील खतगावकर जिल्हा कॉँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष , वरिष्ठ कॉंग्रेस नेत्या शितल ताई रावसाहेब अन्तापुरकर ,अरुणा ताई जाधव जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड , शिला ताई देसाई जिजाऊ जन्मोत्सव अध्यक्ष 2024 , अनिकेत भाऊ राजुरकर मार्केट कमिटी सभापती , डॉ. उत्तम इंगोले वंचित बहुजन आघाडी प्रमुख , अशोक देसाई माजी मार्केट कमिटी सभापती , महेश पाटील शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष , घाळप्पा अंबेसंगे तालुका प्रमूक शिव सेना शिंदे गट , युसुफ मिस्त्री अल्प संख्येक सेना प्रमुख , एकनाथराव पाटील वडगावकर वरीष्ठ कॉंग्रेस नेते , दिगंबरभाऊ कौरवार भा ज पा व्यापारी आघाडी प्रमुख , नारायण पा वड्जे जिल्हाध्यक्ष मराठा मावळा संघटना , कैलास भाऊ येसगे शेतकरी नेते , नामदेव भाऊ थड्के युवा तालुका भाजपा , गजानन पाटील मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष , संजीवनी ताई सूर्यवंशी जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष , जेजेराव पा. शिंदे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष , प्रशांत भाऊ दासरवाड शहर अध्यक्ष भाजपा यांची उपस्थिती होती. सौ. वैशाली जाधव यांच्या सुचनेने डॉ. सुनील जाधव यांनी प्रणीता ताई चिखलीकर यांचे सोहळ्याला अध्यक्षीय नाव घोषित केले त्यास रंजना ताई मानुरे सचिव जिजाऊ ब्रिगेड यांनी अनुमोदन दिले , प्रास्ताविक संजीवनी ताई सूर्यवंशी तालुकाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड यांनी केले . यावेळी मन्च्यावरील अतिथी चा सत्कार करण्यात आला. सुत्र संचालन वैशाली सुनील जाधव / सागावे व डॉ. सुनील जाधव यांनी केले . प्रमुख अतिथी डॉ . मिनल ताई पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व म्हणाल्या की जिजाऊ नी जगातील सर्वोच्च संस्कार शिवरायांना दिले , निती मूल्य शिकवले , कुशल नेतृत्वाचे बाळकडु पाजून स्वराज्य निर्मिती करून रयतेला गुलामीतुन मुक्त केले त्यांचे कार्य समाजा पुढे यावे असा कीर्तनाचा उपक्रम जिजाऊ जन्मोत्सव ठेवला ही खुप अभिमानाची बाब आहे हे डॉ. मिनलताई नी विशद केले . नंतर अरुणा ताई जाधव / शिंदे यांनी मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड सह तेहतिस कक्ष हे समाज प्रबोधन करून माँ जिजाऊ , छत्रपती शिवराय व महामानव यांच्या आदर्श घेऊन समाजात उन्नती यावी या साठी कसे कार्यरत आहे या वर प्रकाश टाकला . शिलाताई देसाई यांनी ही शुभेच्छा दिल्या व सर्वाचे आभार मानले . अध्यक्षीय मनोगत प्रणीता ताई चिखलीकर यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या या वेळी त्यांनी महिला सबलीकरना साठी , माँ जिजाऊ सह महिला महामानव सावित्रीबाई फुले , शेख फातेमा , अहिल्या बाई होळकर यांचा आदर्श घेऊन महिलानी उल्लेखनीय कार्य करावे या साठी सम्बोधन केले.जन्मोत्सव अध्यक्ष शिलाताई देसाई व जिजाऊ ब्रिगेड महिलांनी सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला व डॉ. सुनील जाधव व वैशाली जाधव यांनी सुंदर सुत्र संचालन केले , जिजाऊ च्या लेकिनी मावळें सोबतीला घेऊन पहिल्यांदा असा सामाजिक उपक्रम घेतला व मोठ्या संख्येने देगलुर व परिसरातील बंधु भगिनी नी प्रतिसाद दिला त्या बद्द्ल अध्यक्षीय मनोगतातुन कौतुक करून शुभेच्छा दिल्या ..या सत्कार सोहळ्या नंतर कीर्तनकार वनिता ताई पाटील यांनी जिजाऊ चरित्रा वर कीर्तन केले अंगावर शहरा यावा असा जिजाऊ , शिव चरित्रावर त्यांनी प्रबोधन युक्त कीर्तन केले , महिला सशक्तीकरण , स्त्री भ्रूण हत्या थांबवा , आई बहिणी महिलांचा चा आदर करा , आदर्श चरित्र निर्माण करा , द्वेष , भांडण दुर करा , परस्परातील प्रेम , आदर वाढवा , व्यसन सोडा , महामानवाचा आदर्श घेऊन राजकारण बाजुला ठेऊन समाज उन्नती व विकासाची ज्योत तेवत ठेवा या वर त्यांनी उद्बोधन केले . आभार प्रदर्शनातुन चैतन्याताई वानखेडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले . हा सोहळा यशस्वी करण्या साठी शिलाताई देसाई , संजीवनी ताई सूर्यवंशी , डॉ. सुनील जाधव , नामदेव थड्के , ईश्वर देशमुख , पुष्पा ताई जाधव , मिनाताई सुर्यवंशी , सुशीला ताई गाढवे , विमल ताई मोरे , सुरेखा ताई लोणे , रेजा ताई पाटील , राकेश देसाई , रंजनाताई मानुरे , चैतन्या ताई वानखेडे , गजानन पाटील मुजळगेकर , अँड. अंकुश राजे जाधव , बालाजी जाधव , विशाल पवार , देविदास थड्के , नारायण वड्जे, गजानन पाटील गाढवे , हरिबा सुर्यवंशी , गंगाधर लोणे सर , अच्युत पाटील सुर्यवंशी आदींनी भुमिका पार पाडली जय जिजाऊ … जय शिवराय.
शब्दांकन:– जिजाऊ शिव प्रेमी सौ. वैशाली व डॉ. सुनील जाधव .

Previous articleचाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून नमो चषक भव्य क्रीडा महोत्सव
Next articleछत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करडखेड संभाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले।           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here