Home नांदेड छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करडखेड संभाजी चौक येथे अभिवादन करण्यात...

छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करडखेड संभाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले।           

131

आशाताई बच्छाव

IMG_20240116_210102.jpg

छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करडखेड संभाजी चौक येथे अभिवादन करण्यात आले।                                         देगलूर-(संजय कोंकेवार) देगलूर तालुक्यातील करडखेड येथे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांचे पुत्र संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष प्रजेविषयी कनवाळू आणि भारतीय राजनीतीचे सर्वकष उद्धाते होते.औरंगजेब यांच्याबरोबर टक्कर घेऊ शकेल असा एकच सिंहाचा छावा होता,तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते.अपाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असमान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती व एक उत्तम साहित्यतिक आणि संस्कृतीचे उत्तम जानकारही संभाजी महाराज होते.संभाजी महाराजांनी “बुद्धभूषण” हा संस्कृत ग्रंथ लिहिले होते.अशा या शूरवीर औरंगजेबांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी राजे यांचा आज राज्याभिषेक सोहळा दिन मोठ्या उत्साहाने करडखेड येथे संभाजी चौक येते त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष जेजेराव पाटील,नामदेव पाटील,सुनील जाधव,नारायण पा.वडजे,माधव पा.केरुरे,भरत पाटील,ज्ञानोबा शिंदे लोणी,अंकुशराजे जाधव,ज्ञानेश्वर पाटील,करडखेडचे (सरपंच)गणपत शिळवणे,श्रीनिवास मंदिरलवार,बालाजी ईबितवार,शंकर शिळवणे,अनिल मोरे,व्यंकट शिंदे,राजू शिंदे,बाबू जाधव,जुबेर बागवान,इलियास शेख (पत्रकार)इत्यादी मावळे व संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleदेगलुर मधे जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जिजाऊ चरित्रावर भव्य कीर्तन सोहळा संपन्न.
Next articleसरपंचांनी कापला नळ कनेक्शन, गावातील नागरीक, पाण्यापासून त्रस्त, मोदी सरकार राव मस्त गावकरी त्रस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.