Home जालना जिल्हा काँग्रेस औद्योगीक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नियुक्ती

जिल्हा काँग्रेस औद्योगीक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नियुक्ती

114
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0044.jpg

जिल्हा काँग्रेस औद्योगीक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नियुक्ती
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः जालना जिल्हा काँग्रेस औद्योगीक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते प्रमोद शामराव आल्हाट यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगीक सेलचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे नुकतीच नियुक्ती केली आहे.
जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते प्रमोद शामराव आल्हाट हे गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांचे पक्ष आणि समाजिक कार्य पाहून सदरील नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष श्री. डॉ. सोनारे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, खा. राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात पक्षाचे सक्रीयपणे काम करून पक्ष संघटना अधिक मजबूत करावी असे म्हटले आहे.
जिल्हाध्यक्षपदी प्रमोद आल्हाट यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, डॉ. विशाल धानुरे, विश्वास आल्हाट, गणेश चांदोडे, संतोष खाजेकर, अजिंक्य निकाळजे, जोसेफ आल्हाट, दिपक आव्हाड, चंद्रकांत आल्हाड, प्रफुल पांडव आदींनी अभिनंदन केले आहे.
——–
शेख महेमूद,
अध्यक्ष, जालना शहर काँग्रस कमिटी

Previous articleटोकडे,व-हाणे प्रकरणात मालेगांव तालुक्याचा बिहार करायचा का?
Next articleसमता सैनिक दलासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here