Home जालना समता सैनिक दलासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन

समता सैनिक दलासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20230614-WA0040.jpg

समता सैनिक दलासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने धरणे आंदोलन
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः राज्यातील बौद्ध व इतर समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी व गुन्हेगांरावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी समता सौनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि विविध पक्ष संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर एका निवेदनाद्वारे कायदेशीर मागण्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी विजय राठोड यांना देण्यात आले.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बोंडार या गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव यांचा निघृन खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्यात यावा. मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथिल सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात हिना मेश्राम नावाच्या तरुणीवर अत्याचार करून खून झाल्याबाबत स्थानिक वस्तीग्रहाचे वार्डन, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी आणि जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून या घटनेचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. रेनापूर जि. लातूर येथील मातंग समाजाचे गिरीधारी तपवाले यांनी 3000 रूपय व्याज दिले नसल्याच्या कारणावरून हात मोडला. याप्रकरणी गिरीधारी पोलीस ठाण्याला फिर्याद देण्यासाठी गेला असता पोलिसांनी फिर्याद तर घेतलीच नाही, परंतु गिरीधारी फिर्याद देण्यासाठी गेला म्हणुन सावकारी पेशातील नराधम व त्याच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने गिरीधारी तपधाले व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जबर मारहाण केली. यामध्ये गिरीधारी यांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here