Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे कोरोना covid-19 जनजागृती साठी जय सेवादास सांस्कृतिक...

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे कोरोना covid-19 जनजागृती साठी जय सेवादास सांस्कृतिक कला मंडळ मुगाव तांडा यांचा कार्यक्रम संपन्न..

180
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील मौजे जाहुर येथे कोरोना covid-19 जनजागृती साठी जय सेवादास सांस्कृतिक कला मंडळ मुगाव तांडा यांचा कार्यक्रम संपन्न..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे दि. 31 जानेवारी 2021 रोजी कोरोना (covid-19) जनजागृतीसाठी जय सेवादास सांस्कृतिक कला मंडळ मुगाव तांडा यांनी गीतांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई 32 व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड या संचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगाने जय सेवादास सांस्कृतिक कला मंडळ मुगाव तांडा ता. नायगाव जिल्हा नांदेड या कला संचाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जागृत करण्यासाठी व त्यामध्ये कोरोना महामारी या भयानक बिमारी ला आळा बसवण्यासाठी गीतांच्या माध्यमातून जनतेला सावध करण्यात येत आहे. वेळोवेळी साबणाने हात धुवा नाकाला तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरा सानीटायझरचा वापर करा गर्दीमध्ये जाण्याचे टाळा या नियमाचे पालन करावे असे मनोरंजनाच्या माध्यमातून जागरूक केले मोलाचे प्रबोधन करून गावकऱ्यांना जागृत केले आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना covid19 वर मात करण्यासाठी लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण गीतांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. यामध्ये जय सेवादास कला मंडळातील सहभागी कलाकार शाहीर नामदेव अमृता जाधव गायक हर्मोनियम नामदेव शंकर डोणगावे गायक आबाजी मारोती डुबुकवाड गायिका शेशीकला मल्हारी सूर्यवंशी चिपळी कोरस दिगंबर संभाजी दूयेवा र पथनाट्य कलावंत नारायण भीमराव कोसंबे , त्रिंबक मनोहर डोनगावे ढोलकी वादक राजेन्‍द्र रामकिशन तुरटवाड कोरस तूनतूने गणपत बाबाराव कानगुलवार खंजीर वादक तबला वादक गिरिराव दिगंबर आदी कलाकारांचा समावेश होता. यावेळी भारत सावकार दामेकर, माधव चंचलवाड ,ब्रहमा महाराज, राहुल बोडके व गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनागपूर जिल्ह्यात पल्स पोलिओ उत्साहात
Next articleजिल्हाधिकारी यांची नवे पारगाव व टोप येथील भटक्या-विमुक्त समाजाला भेट. 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here