• Home
  • जिल्हाधिकारी यांची नवे पारगाव व टोप येथील भटक्या-विमुक्त समाजाला भेट. 

जिल्हाधिकारी यांची नवे पारगाव व टोप येथील भटक्या-विमुक्त समाजाला भेट. 

 

 

कोल्हापूर : सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव व येथील भटका-विमुक्त गोपाळ समाजातील साठ कुटुंबांच्या  वसाहती बांधणे करीता निवड केलेल्या जमीनीचा आगाऊ ताबा आदेश कामी कोल्हापुर जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा समाज कल्याण साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन याठिकाणांची पाहणी केली.यावेळी भटका-विमुक्त गोपाळ समाजाचे नेते भिमराव साठे,  हातकणंगलेचे तहसीलदार प्रदीप उबाळे,वाठार तर्फ वडगावच्या मंडल आधिकारी अनीता खाडे,कसबा वडगावचे मंडल अधिकारी गणेश बर्गे,पारगावचे गावकामगार तलाठी प्रधान भानसे, वाठारचे तलाठी शामराव पाटील,टोपचे तलाठी जयसिंग चव्हाण,ग्रामसेवक देवकाते यांच्यासह भटका समाज मुक्ति आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे,संपर्क प्रमुख सुशांत कांबळे,सल्लागार सुधाकर कांबळे  व समस्त गोपाळ समाज बांधव उपस्तीथ होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क.

anews Banner

Leave A Comment