• Home
  • भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रणजीतसिंह पाटील , तालुका उपाध्यक्षपदी पियुष शहा

भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रणजीतसिंह पाटील , तालुका उपाध्यक्षपदी पियुष शहा

 

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात भाजपा युवा मोर्चा वडगांव शहरअध्यक्ष व हातकणंगले तालुका उपाध्यक्ष निवड करण्यात आल्या.
वडगांव शहर भाजपा युवा मोर्चा च्या वडगांव शहर अध्यक्षपदी रणजीतसिंह पाटील तर हातकणंगले तालुका उपाध्यक्ष पदी पियुष शहा यांची निवड करण्यात आली.
तसेच भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती अध्यक्षपदी श्री. राजेंद्र वायदंडे यांना भाजपाचे स्कार्फ व नियुक्त पत्र कोल्हापूर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष माननीय श्री.डाँ. अशोक दादा चौगुले, यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीस डाँ.चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच वडगांव शहर भाजपाध्यक्ष जगन्नाथ माने, भाजपा शहर कार्यकारणी सर्व बुथ प्रमुख तसेच शक्ती प्रमुख यांचे तर्फे सर्व निवड केलेल्या मान्यवरांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी वडगांव शहरातील भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते विजुभाई शहा , भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा सरचिटणिस सचिन सलगर. भाजपा तालुका अध्यक्ष
बंडा गोंदकर ,सुधाकर पिसे , रविंद्र गुरव , सुनिल लाड ,बापू ढोबळे , श्रीपती माने ,जगन्नाथ माने , इत्यादी मान्यवर व भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment