Home नांदेड ज्येष्ठ नागरिकांनी भारत सरकारची हेल्पलाईन नं 14567 लाभ घ्यावा,- उ. मराठवाडा ज्येष्ठ...

ज्येष्ठ नागरिकांनी भारत सरकारची हेल्पलाईन नं 14567 लाभ घ्यावा,- उ. मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष अशोकजी तेरकर

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0027.jpg

ज्येष्ठ नागरिकांनी भारत सरकारची हेल्पलाईन नं 14567 लाभ घ्यावा,- उ. मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष अशोकजी तेरकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने संपूर्ण देशभरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी व सहाय्यासाठी एल्डर लाईन 14567 ची सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाईन – 14567) जनसेवा फॉउंडेशन तर्फे चालविण्यात येत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी हेल्पलाईन कनेक्ट सेंटर, फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून हे काम चालू आहे.
हेल्पलाईन मार्फत माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार आणि क्षेत्रीय पातळीवर मदत या चार टप्यात काम चालू असून यात माहिती क्षेत्रात – आरोग्य, जागरूकता, निवारा/वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर, ज्येष्ठासंबंधि अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, अध्यात्मिक कला-करमणूक ई. मार्गदर्शन – कायदेविषयक, आर्थिक, पेन्शन संबंधित, सरकारी योजना ई. भावनिक आधार – चिंता, निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन, मृत्यू पूर्वीचे दस्तऐवजीकरण ई. क्षेत्रीय पातळीवर मदत – बेघर, अत्त्याचारग्रस्त वृद्द व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाईन कार्यरत आहे.
एल्डरलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 असा असून हेल्पलाईनची वेळ सकाळी 08:00 पासून ते संध्याकाळी 08:00 पर्यंत असून आठवड्यातील सर्व दिवस हेल्पलाईन कार्यरत आहे.
तरी अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी सदर हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन उ.मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघटना (फेस्कॉम)चे अध्यक्ष अशोकजी तेरकर यांनी केले आहे.

Previous articleजाखोड मध्यवर्ती रोपवाटिकेत विक्रमी रोपांची निर्मिती.
Next articleमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेमध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम :
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here