Home नाशिक जाखोड मध्यवर्ती रोपवाटिकेत विक्रमी रोपांची निर्मिती.

जाखोड मध्यवर्ती रोपवाटिकेत विक्रमी रोपांची निर्मिती.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0015.jpg

जाखोड मध्यवर्ती रोपवाटिकेत विक्रमी रोपांची निर्मिती.
संदीप गांगुर्डे प्रतिनिधी
पिंगळवाडे युवा मराठा न्युज
वनपरिक्षेत्र ताहाराबाद यांच्या अंतर्गत येणारे जाखोड मध्यवर्ती रोपवाटिका या वर्षीसुद्धा विक्रमी रोपांची निर्मिती करण्यामध्ये यशस्वी
उप विभागीय अधिकारी मालेगाव जे.एन. एडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी ताहाराबाद शिवाजी सहाने यांच्या प्रयत्नातून यावर्षी जाखोड मध्यवर्ती रोपवाटिका येथे विविध प्रकारचे जंगली झाड रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात निकेत, सीताफळ, बांबू, करंज, कांचन, आवळा, शिसव, आंबा, बोर, उंबर, मोगगनी इ.
विशेष बाब म्हणजे या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर रक्तचंदनाची दोनशे रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. या रोपवाटिकेत साधारण दोन लाख रोपांची निर्मिती झाली आहे. हे रोप विविध गावांच्या जंगल संपत्ती वाढवण्यासाठी दिली जाणार आहेत. त्यात राहुड, बिलपुरी, भिलवाड, कातरवेल, माळीवाडी, चाफ्याचापाडा,जाड, मानूर, मूल्हेर, मोरदरा या गावांचा समावेश आहे या रोप लागवडीसाठी शासनाने ठरवून दिलेला कालावधी जुलै अखेर असणार आहे. अशी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तसेच ही रोपवाटिका रोपनिर्मितीसाठी डिसेंबर ते जून महिना अखेरीस होता. याच अनुषंगाने खाजगी किंवा विक्री स्वरूपातून बियाणे उपलब्ध करून या रोपवाटिकेमध्ये रोपे निर्मिती झाली आहे. रोपनिर्मितीसाठी सुरुवातीपासून साधारण पंधरा मजुरांची आवश्‍यकता असते. याची आवश्यकता संबंधित रोप वाटिका कर्मचारी देवीदास कांबडी यांनी उपलब्ध करून दिले. या कामी वनविभागाचे सर्वच कर्मचारी कार्यरत होते.त्यात विशाल दुसाने, एस. पी. चौरे देविदास कांबडी इत्यादी काम पाहत होते.

 

शासनाच्या धोरणानुसार वनविभाग यांच्या आदेशान्वये दरवर्षी रोप लागवडीचे कामे होत असतात. याच अनुषंगाने परिसरात पावसाळ्यात 215 हेक्टर जमिनीवर नवीन रोपे लागवडीस तयार आहे

शिवाजी सहाणे
परिक्षेत्र अधिकारी ताहाराबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here