Home संपादकीय टोकडे,व-हाणे प्रकरणात मालेगांव तालुक्याचा बिहार करायचा का?

टोकडे,व-हाणे प्रकरणात मालेगांव तालुक्याचा बिहार करायचा का?

172
0

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1686791063363.jpg

टोकडे,व-हाणे प्रकरणात मालेगांव तालुक्याचा बिहार करायचा का?
वाचकहो,
आपला देश हा लोकशाहीप्रधान देश आहे.आणि या देशाची लोकशाही हि फक्त चार खांबावर म्हणजे अर्थातच चार स्तंभावर तग धरून आहे.खर तर लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.पण आजकाल लोकासाठी नव्हे तर स्वतः साठीच हुकूमशहा पध्दतीने चाललेले राज्य म्हणजे लोकशाही असे गोंडस नाव या लोकशाहीप्रधान असलेल्या देशात सध्या अंगवळणी पडत चालले आहे.जनतेच्या हितासाठी व लोकांच्या कल्याणासाठी झटण्याचे काम ज्या लोकप्रतिनिधीना बहाल केले आहे,ते तर मुग गिळून स्वतः चे घरे भरण्यात मश्गूल झालेली आहेत.( हा आहे लोकशाहीचा एक खांंब), ज्या सामान्य जनतेचे कोटकल्याण करु अशा अर्विभावात वावरणारे प्रशासनातील अधिकारी लाखो रुपयांचा पगार घेऊनही सामान्य माणसांकडून जेव्हा शे पाचशे रुपये घेतात व त्यास वर्षानूवर्ष लटकवत ठेवतात.(तर हा आहे लोकशाहीचा दुसरा खांब) ज्या न्यायालयात आम्ही दाद मागायला जातो,तेथेही आम्हांला वर्षानूवर्ष येरझा-या माराव्या लागतात आणि त्या न्यायालयात देखील सत्याचा जय होईल याची शाश्वती नाही,(हा झाला लोकशाहीतला तिसरा खांब) शेवटी अखेर राहतो लोकशाहीचे रक्षण करणारा व अब्रु वाचविचारा चौथा खांब स्तंभ म्हणजे पत्रकारिता! आम्ही असा दावा नक्कीच करत नाहीत की,पत्रकारितेत भ्रष्टाचार बोकाळलेला नाही,पण…बोटावर मोजण्याइतकेच भ्रष्ट व हातमिळवणी करणारे पत्रकार सोडले तर आजही लोकशाहीप्रधान देशाच्या बाजुने व न्याय हक्कासाठी लढणारे पत्रकार फक्त औषधा इतकेच उपलब्ध आहेत.
अन..हा सगळा लेखाजोखा मांडण्याचा हेतू व उद्देश एवढाच की? आता सगळेच क्षेत्र बरबटलीत.पैश्यांसाठी वाट्टेल त्या थराला चाललीत.पण..आम्ही “युवा मराठा”च्या माध्यमातून लढतोय सत्यासाठी! सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी..या विचाराने.मात्र अगदी काल परवा म्हणजे रविवारी दिनांक ११ जुन रोजी टोकडे गावात ग्रामस्थांच्या आग्रहाखातर एका बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विद्यमान सरपंचाच्या घराचे आम्ही चित्रीकरण करावयास गेलो असता.तेथे शे सव्वाशे महिलांचा जमाव जमवून आरडाओरड करीत धक्काबुक्की करीत आमच्या जवळील चित्रीकरणाचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला.हि दहशत व दांडगाईची हिंमत या लोकांमध्ये नेमकी येते कोठून? ज्या ज्या गावात (अ)कर्तबगार ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे पाय ठेवतात त्या गावाचे पुरते वाटोळे झालेच म्हणून समजा!टोकडे प्रकरणात आमचा चित्रीकरणाचा मोबाईल फोन हिसकाविणा-या महिलांकडे जाऊन तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरिक्षक दर्जाच्या अधिका-याला कोळी यांना जाऊन तो चित्रिकरणाचा मोबाईल आणून द्यावा लागला.तर दुसऱ्या घटनेत व-हाणे ज्या ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेचा पायगुण लागला त्या गावात सन २०२० पासून साडेसाती लागली खरी…पण गावातले माजलेले गावसांड आम्हांला धमक्या देण्याबरोबरच “तुम्ही या गावाचे नागरिक आहात का?” तुम्हांला काय अधिकार आमच्या गावात लक्ष घालण्याचा अशा बेताल व रानटी भाषेतील वल्गना करुन एकंदरीत वक्तव्यावरुन आम्हांला संपविण्याच्या धमक्याच हे व-हाणेतील भुरटे भडभुंजे करीत आहेत हे सिध्द होते.हा सारासार लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून,एकंदरीत मालेगाव तालुक्याला बिहार करण्याच्या व दादागिरी माजवून आम्ही खुपच नामचीन गावगुंड आहोत हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न या भुरटया कुळ नसलेल्या “गो” केलेल्या हद्दपारांनी आम्हांला दाखवू नये.अन्यथा लेखनीच्या भस्म युध्दात आपली राखरांगोळीच होईल! हा बिहार नव्हे.लोकशाही जपणारा देश आहे याचे भान ठेवावे एव्हढेच यानिमिताने!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here