• Home
  • अनुसूचित जातींच्या बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची निवड यादी प्रसिद्ध

अनुसूचित जातींच्या बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची निवड यादी प्रसिद्ध

अनुसूचित जातींच्या बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची निवड यादी प्रसिद्ध

नांदेड,दि. ६ : राजेश एन भांगे

अनुसूचित जातींच्या स्वयंसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनि ट्रॅक्टरची निवड यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवड यादीत ज्या बचतगटांची नावे आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची मुळ पावती जीएसटीसह सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित असून लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने सन 2018-19 या वर्षात ज्या बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी एकूण 365 बचतगटांनी अर्ज केले होते. प्राप्त अर्जात 163 बचतगटांचे अर्ज तपासणी अंती पात्र ठरविण्यात आले होते. या पात्र बचतगटांमधून सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्राप्त तरतुदीनुसार 97 बचतगटांची निवड करण्यात आली आहे. ही निवड यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ज्ञानमाता शाळेच्यासमोर, अर्धापूर रोड, नांदेड येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. ज्या बचतगटांचे नाव यानिवड यादीत आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करुन खरेदी केल्याची मूळ पावती जीएसटीसह सादर करावी असेही आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment