Home नांदेड बेटमोगरा येथील जि प हा शाळेतील सन १९९५ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा...

बेटमोगरा येथील जि प हा शाळेतील सन १९९५ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

42
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220509-WA0016.jpg

बेटमोगरा येथील जि प हा शाळेतील सन १९९५ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.

चौकट-

तब्बल २७ वर्षानंतर शाळेतील माजी विद्यार्थी एकत्रित सहभागी झाल्याने,जुन्या आठवणींना उजाळा

संयोजकाची संकल्पना कौतुकास्पद,या शाळेने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चे व्यक्तिमत्व घडविले- सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड/
बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील सन १९९५ मधील वर्ग दहावी च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा अर्थात गेट-टु-गेदर हा कार्यक्रम दि.८ मे २०२२ या दिवशी येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत डॉ.दत्तात्रय त्र्यंबक पाटील यांच्या संकल्पनेतून व सर्व तत्कालीन बॅच च्या माजी विद्यार्थ्यांच्या संयोजनासह सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठ संस्थांनचे मठाधिपती श्री.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, तर कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. योगेश्वर प्रकाशदेव जोशी बेटमोगरेकर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव हेळगीरे सर धामणगावकर,विश्वंभर उकादवडे सर,गोपाळराव पुजारी सर,बालाजी सकिनवार सर, वाय.डी.भैरवाड (मुख्याध्यापक), सा.लोकसंकेत चे संपादक नामदेव यलकटवार,बेटमोगरा येथील पत्रकार मुस्तफा पिंजारी,व पत्रकार तथा स्वाभिमान भारत न्युज चे संपादक भारत सोनकांबळे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे,गुरुजन वर्ग व पत्रकार बांधवांचा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सकीनवार सर,
उकादवडे सर यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त केला. तर श्री.माधवराव हेळगीरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाज विद्यार्थी व शाळा यांच्या एकत्रित सहकार्यातून शाळेची प्रगती होऊ शकेल आणि आणि माजी विद्यार्थी हा शाळेचा कणा आहे,समाजामध्ये जीवन जगत असताना व्यायामाला अनन्यसाधारण महत्व असून प्रत्येकाने व्यायाम करून शरीर तंदुरुस्त व सुदृढ ठेवावे असे सांगत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असेच म्हणावे लागेल असे प्रतिपादन केले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ह.भ.प. योगेश्वर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते बोलताना म्हणाले हा शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा आतापर्यंतचा प्रथमच कार्यक्रम असल्याचे सांगितले. त्याचबरोबर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठ संस्थांनचे मठाधीश श्री.सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांनी शाळेतील तत्कालीन जुन्या आठवणींना उजाळा देत या शाळेने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व घडविले असून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी या शाळेमुळे घडले असे प्रतिपादन केले. या स्नेह संमेलनात माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी मिळूण असे ४२ जन सहभागी झाले होते. पुन्हा एकदा एकत्र जमलेले माजी विद्यार्थी आठवणी हरपून गेले होते. प्रत्येक जन आपली शाळा कशी आहे. हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता.तब्बल २७ वर्षांनी
वर्ग मित्र मैत्रीनी एकत्र जमल्याच्या स्नेह मिलनाने शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या कार्यक्रमाची प्रथम संकल्पना डॉ.दत्तात्रय पाटील यांना सुचताच त्यांनी आपले वर्ग मित्र मारोती सोपान पिटलेवाड,दिपक सोनकांबळे,विशाल पल्लोड,संतोष सुवर्णकार,सलीम दौलताबादी,बळवंत टेकाळे,मुस्तफा सय्यद,संजय संगनाळे, विठ्ठल पाटील,संतोष मुक्कावार, शिवाजी टेकाळे,भत्ते सर,
बालाजी सोनकांबळे,दिलीप सुधाकर कलेपवार,परमेश्वर पाटील,मामीडवार,सोनटक्के,कुरेशी,यांच्यासह वर्ग मैत्रिणी प्रभावती गुंडावार, सुजाता मामीडवार,मंगल उत्तरवार, प्रतिभा जोशी, कोंडा पाटील,नंदा पाटील,जयश्री उंद्रे,अनिता स्वामी आदींसह एकूण ४२ माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी यांच्या सहकार्यातून व संयोजनाने हा कार्यक्रम घडून आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वाय.डी.भैरवाड, राठोड सर,मठपती सर,बतकुलवार सर,रणवीरकर,मॅडम माळगे मॅडम,सेवक मौला मामा नंदगावकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दत्तात्रय पाटील,तर आभार मारोती सोपान पिटलेवाड यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता भोजनाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here