Home नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता त्वरित दुरुस्त करा – मनसेची मागणी

राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता त्वरित दुरुस्त करा – मनसेची मागणी

33
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0011.jpg

राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता त्वरित दुरुस्त करा – मनसेची मागणी

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर – उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे गोजेगाव – मुक्रामाबाद ते
रावणकोळा पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्यावरुन प्रवाश करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवाश करावा लागत आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करा अशी मागणी देगलुर मनसेच्या वतीने मा. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग
विभाग नांदेड यांच्या कडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
देगलुर उदगीर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे गोजेगाव मुक्रामाबाद ते रावणगोळा पर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून चार चाकी वाहणास इतर वाहणास दळण – वळण करण्यास अडचणी निर्माण होत आहेत . याव्यतिरिक्त आपातकालीन परिस्थीतीत रुग्णवाहिका , अग्निशमन वाहन यांची ही वाहणे ये – जा करणे अवघड झाले आहे यामुळे अपघात घडल्यास तात्काळ आपातकालीन सेवा पुरविणे अवघड होत आहे . तसेच सध्यास्थितीत रस्त्याची अवस्था पाहिल्यास रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी आदरणीय मे . साहेबांनी वरील विषयांचे गाभियाने ओळखुन नमुद रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा नाईलाजास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लाक्षणीक आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देगलुर तालुकाध्यक्ष श्रीकांत काळे व मनसे सैनिक आकाश विठ्ठलराव देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleशेगाव ते पातुर्डा,कोद्री मार्गे तेल्हारा बस सेवा सुरू
Next articleबेटमोगरा येथील जि प हा शाळेतील सन १९९५ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here