Home बुलढाणा वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईन वर..? येथील आरोग्य केंद्राशी सतरा गावे...

वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईन वर..? येथील आरोग्य केंद्राशी सतरा गावे जोडलेली आहेत..!

132
0

आशाताई बच्छाव

IMG-20220918-WA0026.jpg

वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
सलाईन वर..? येथील आरोग्य केंद्राशी सतरा गावे जोडलेली आहेत..!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला एकलारा गावासह 17 गावे जोडलेले आहेत
प्राथमिक आरोग्य केंद्राने २४ तास सेवा देणे गरजेचे आहे. स्थानिक उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे तसेच रेफरल व प्रयोग शाळेच्या सेवा पुरवणे इ. कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडत असतात.परंतु संग्रामपुर तालुक्यात वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील
आरोग्य सेवा कोलमडली आहे.
वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळणे फार कठीण झाले आहे. या आरोग्य केंद्रातील जवळपास सर्वच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. परंतु या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत आहेत. हे कर्मचारी कधीच शासकीय वेळेत या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचत नाहीत. त्यामुळे या आरोग्य केंद्रामधून रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. इतकी वाईट परिस्थिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून बसल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारीदेखील बाहेर तालुक्यातुन येणे-जाणे करतात. त्यामुळे येथे गंभीर समस्या निर्माण झाल्यास रुग्णाला या प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे.या आरोग्य केंद्रात अश्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे संबंधित रुग्णांना अकोला येथे उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे वानखेड येथील आरोग्य केंद्र केवळ शोभेची वास्तू बनली आहे. वरिष्ठ अधिकारी संग्रामपुर तालुक्यातील वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. आरोग्य सेवेत कोणतीही सुधारणा झाली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील जाग आली नाही व शासनालाही जाग आली नाही.निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे? नागरिकांचा सवाल
अशावेळी सर्वांना हक्काचा आणि आपले रडगाणे ऐकणारा जवळचा माणूस वाटतो, तो म्हणजे आपला लोकप्रतिनिधी. निवडणूक प्रसंगी वारंवार भेटी घेणारे, आश्वासनांची खैरात वाटणारे लोकप्रतिनिधी आज मात्र, अशा अडचणींच्या प्रसंगी शोधूनही सापडत नसल्याचे वानखेड वासीयांचे म्हणणे आहे. परिणामतः वानखेड वासीयांत लोकप्रतिनिधी बाबत प्रचंड प्रमाणात रोष पहायला मिळत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आरोग्य केंद्रातील सेवा ढेपाळली आहे.वानखेड येथील आरोग्य केंद्रातील सेवा ढेपाडल्यामुळे सतरा गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असून वेळीच रुग्णांची अवहेलना थांबवून काम चुकार व मुख्यालयी न राहणाऱ्यां आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here