Home नांदेड देगलुर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस जल्लोषात साजरा.

देगलुर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस जल्लोषात साजरा.

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20220918-WA0031.jpg

देगलुर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस जल्लोषात साजरा.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:१८:- काल १७ सप्टेंबर २०२२ ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’देगलूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी देगलुर बिलोली आमदार जितेश अंतापुरकर , सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्याजी शर्मा , तहसीलदार राजाभाऊ कदम , गटविकास अधिकारी देशमुख सर , मुख्याधिकारी इर्लोड जी. एच. , पोलीस निरीक्षक सोहन माछरे , परगेवार सर मोरे सर नायब तहसीलदार अंगद नेटके ,पन्गे सर , संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष डॉ. सुनील जाधव , प्रसिद्धी प्रमुख रूपेश पाटील यांच्या सह सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी , प्रशासकीय अधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , विद्यार्थी , पोलीस प्रशासन , तहसील, नगर परिषद चे कर्मचारी , सर्व देशप्रेमी यांची ही उपस्थिती होती .सुरुवातीला ध्वजारोहण व मानवंदना झाली या वेळी कन्या हायस्कूल द्वारा राष्ट्रगीत सादर करण्यात आले .या प्रसंगी डॉ. सुनील जाधव यांनी सारे जहाँ से अछ्या हे गीत सादर केले , अनुपमा शिंदे व सविता कुराडे सह विद्यार्थ्यानी मराठवाडा मुक्ती संग्राम पर गीत सादर केले . शंकर कूद्रे सर यांनी सूत्र संचालन केले .अनुसूचित जाती व जमाती दक्षता नियंत्रण समिती वर मोगलाजी शिर्शेटवार , मछिंद्र गवाले , श्रावण नरबागे, अनिल कोल्हे यांची निवड झाल्यामुळे व दिल्ली येथे किरण मुधोळकर यांच्या उत्क्रुष्ट फोटो कार्यात मिळालेल्या यशा बद्द्ल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला व क्यु. आरकोड कार्ड चे विमोचन झाले . या प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे जयंती देखील साजरी करण्यात आली .नायब तहसीलदार अन्गद नेटके , पेशकार साहेब , गिरी साहेब , बुक्कावार तलाठी साहेब , चैनपुरकर , शंकर कूद्रे सह उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला .

Previous articleसंभाजी ब्रिगेडच्या देगलूर – बिलोली विधानसभा उपाध्यक्ष पदी ईश्वर देशमुख यांची निवड.
Next articleवानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईन वर..? येथील आरोग्य केंद्राशी सतरा गावे जोडलेली आहेत..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here