Home जालना गौरी गणपती समोर हिमालयाचा अनोखा देखावा

गौरी गणपती समोर हिमालयाचा अनोखा देखावा

277

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0069.jpg

गौरी गणपती समोर हिमालयाचा अनोखा देखावा!                                                              जालना दि.२३(ब्युरो चीफ दिलीप बोंडे) गौरी व गणपतीच्या सणाला यावर्षी हिमालयाचा  पर्यावरणपूरक देखावा सौ.धनश्री रामदास कुलकर्णी,श्री.रामदास कुलकर्णी परिवारांने तयार करून पारंपारिक पद्धतीने सण उत्सव साजरी करण्याची परंपरा जोपासली आहे.                          शहरातील आनंदवाडी श्रीराम मंदिर परिसरातील कुलकर्णी परिवार दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला गौरी समोर सजावट करून देखावा करतात.देखाव्यातून सामाजिक व  भारतीय सांस्कृतिक आशयाचा संदेश देण्यासह नवीन पिढीला ओळख व्हावी,हा यामागील उद्देश आहे.घरातील सौ.धनश्री रामदास कुलकर्णी,डॉ.प्रल्हाद कुलकर्णी,अमोघ कुलकर्णी, अंतरा कुलकर्णी यांनी गौरी गणपती समोर यावेळेस ‘हिमालय पर्वत’ हा अनोखा देखावा यावर्षी साकारला आहे.यात देवाचे देव महादेव यांचा हिमालयातील अनोखा देखावा साकारला आहे. यामध्ये शाडूच्या माती,पुठ्ठा, रांगोळी,कागद,लाकूड, लाकडाचा भुसा,दगड,रंग, बाबू,खळ,गोनपाट आणि नैसर्गिक पाने व फुले वापरून पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. दरवर्षी इको फ्रेंडली देखावा कुलकर्णी परिवाराच्या वतीने तयार केला जातो. आणि देखाव्यातील सर्व निर्माल्य यापासून नैसर्गिक उदबत्ती तयार करणार असल्याचे कुलकर्णी परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.परिसरातील महिला देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Previous articleगणेश विसर्जनाला DJ मुक्त करून पारंपरिक वाद्याचा वापर करावा.-सा.पो.निरीक्षक मा.भालचंद्र तिडके
Next articleसमृद्धी साखर कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.