Home जालना समृद्धी साखर कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत

समृद्धी साखर कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0066.jpg

समृद्धी साखर कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत
फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

अंबड/घनसावंगी/जालना(ब्युरो चीफ दिलीप बोंडे)- :गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप  झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला  समृद्धी साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला. याची अधिकृत घोषणा २१ सप्टेबर रोजी  कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली. या  निर्णयाचे शुक्रवारी अंबड -घनसावंगी तालुक्यातील गावागावात  ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले.

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप  झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला  घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने  एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना  २ हजार ८०० रुपये टनप्रमाणे  अंतिम  बिल मिळणार आहे.  गळीत  हंगाम २०२२-२३ मध्ये  अंबड –घनसावंगी तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात  उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी कारखाना आघाडीवर राहीला आहे. समृद्धी कारखान्याचे व्हाईस चेअमरन महेंद्र मेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या  संचालक मंडळाच्या  बैठकीत  शेतकऱ्यांना ११० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडून भाववाढीचा आनंद साजरा केला. यावेळी शेतकरी किसनराव कोरडे, विठ्ठल आबा कोरडे, गजानन कोरडे, अंगत ऐसलोटे, शिवाजी कोरडे, विष्णू कोरडे, रामेश्वर गरड, गोविंद कोरडे, विक्रम कोरडे, विलास कोरडे, सतीश कोरडे, उध्दव कोरडे, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर कोरडे, बळीराम कोरडे ,विठ्ठल बेलनुर, भिमराव ऐसलोटे, परमेश्वर ऐसलोटे, गोरख कोरडे व गावकरी उपस्थित होते.

Previous articleगौरी गणपती समोर हिमालयाचा अनोखा देखावा
Next articleटाँप टेन ब्रेकींग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here