Home अमरावती कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांचा विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कडून सत्कार

कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांचा विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कडून सत्कार

73
0

आशाताई बच्छाव

IMG_20240206_153510.jpg

कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांचा विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कडून सत्कार

प्रतिनिधी धनराज खर्चान /भातकुली ( अमरावती)

भातकुली -: जिल्हा स्तरीय कृषी जल्लोष व सांस्कृतिक कार्यक्रम २०२४ मध्ये कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांना विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी भातकुली मधील मंडळ कृषी अधिकारी टाकरखेडा शंभू अंतर्गत मुख्यालय टाकरखेडा शंभू येथे कार्यरत कृषी सहाय्यक रूपाली वसंतराव ठाकरे यांनी 2023 /24 या वर्षी तालुका कृषी अधिकारी भातकुली मार्फत राबविण्यात आलेले राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना प्रकल्प गावामध्ये राबविण्यात आला. या प्रकल्पाची नोंदवही शेतीशाळा व प्रशिक्षण याचे उत्कृष्ट जतन कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट विस्तार कार्याची नोंद घेऊन विभागीय कृषी सहसंचालक अमरावती किसन मुळे यांनी सहाय्यक रूपाली ठाकरे यांना प्रशस्तीपत्र देऊन यांचा सन्मान करण्यात आला. या कृषी जल्लोष कार्यक्रमाला विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती किसन मुळे , विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती राहुल सातपुते ,उपविभागीय कृषी अधिकारी पंकज चेडे, उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांनी तालुका कृषी अधिकारी प्रमोद खर्चान यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने मला हा पुरस्कार मिळाला.त्याबद्दल त्यांचे आभार मानते असे मत यावेळी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here