Home भंडारा साहित्य दर्पण कला मंच नागपूर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण...

साहित्य दर्पण कला मंच नागपूर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि भव्य राज्यस्तरीय कवी सन्मानाचे आयोजन 11 फरवरीला

110
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_123832.jpg

साहित्य दर्पण कला मंच नागपूर च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि भव्य राज्यस्तरीय कवी सन्मानाचे आयोजन 11 फरवरीला

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे विशेष कार्यक्रमाचे होणार आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )
साहित्य दर्पण कला मंच नागपूरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलनी, साई मंदिर जवळ वर्धा रोड, नागपूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन सोहळ्याचे आयोजन 11 फेब्रुवारी 2024 रविवारला करण्यात आलेले आहे .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद जाधव समूह प्रमुख सल्लागार, लाॅपिंग ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर, कायदेशीर मुंबई, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन संगीता जामने साहित्यिक परभणी यांच्या हस्ते व सह उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अशोकजी टेंभुर्णीकर नागपूर व कैलासजी धोंडणे वनपरिक्षेत्र अधिकारी ब्रम्हपूरी हे राहतील. संस्थापिका मा. कल्पना अशोक टेंभूर्णीकर नागपूर, प्रमुख अतिथी नरेंद्र पवार, मा. रवींद्रजी जनवार सचिव, गोंडवन विकास संस्था
नागभीड, डॉ सानिया खान ,प्रा.भीमराव गायकवाड, विलास गजभिये संध्या राजूरकर संपादिका बहुजन सौरभ ,जगदीश राऊत, गणेश मोरे,प्रा.लक्ष्मणजी शहारे,शोभा वेले, सुभाष मानवटकर, मधुकर दिवेकर ,जगदीश राऊत ,उपस्थित राहतील. पहिल्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे .९.३० वाजता संविधान प्रास्ताविकेचे वाचन, १० वाजता पाहुण्यांचा सत्कार, १०.३० वाजता, बाप संग्रहणाचा प्रकाशन लोकार्पण सोहळा ११ वाजता, ११.३० वाजता पुरस्कार वितरण, मान्यवराचे मनोगत १२वाजता नंतर सहभोजन ,
दुसरे सत्र राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व भव्य राज्यस्तरीय कवी संमेलन दुपारी २ वाजता सुरू होईल .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक सुनंदा जुलमे समाजसेविका लेखिका कवयित्री साहित्यकार नागपूर राहतील .प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विनोद पवार मुंबई ,डॉ नरेंद्र पवार मुंबई, संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य (भंडारा) ,शालिक जिल्हेकर ,मनोहर गजभिये ,माणिक खोब्रागडे, सुधीर मने ,हंसराज शहारे ,महेंद्र दुपारे नारायण बागडे अर्चना चव्हाण, संजय सहारे, प्रकाश दूलेवाले, यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे निवेदिका छाया जांभुळे ब्रह्मपुरी त्याचप्रमाणे निवेदक सतीश सोमकुवर नागपूर राहतील .कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कल्पना अशोक टेंभुर्णीकर .प्राध्यापक नानाजी रामटेके. लोकमुद्रा शहारे, वैशाली खंडारे, डॉ हरिश्चंद्र धीवार, माला मेश्राम मुंबई, कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यांनी केलेले आहे. (पुर्णप्रकाशित )

Previous articleटाकळी विंचूर विद्यालयाचा राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा दबदबा कायम
Next articleकृषी सहाय्यक रूपाली ठाकरे यांचा विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कडून सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here