Home नाशिक टाकळी विंचूर विद्यालयाचा राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा दबदबा कायम

टाकळी विंचूर विद्यालयाचा राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा दबदबा कायम

190
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_132423.jpg

टाकळी विंचूर विद्यालयाचा राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पुन्हा एकदा दबदबा कायम

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर तालुका निफाड विद्यालयाचे सब ज्युनिअर राज्यस्तरीय अथेलेटिक्स अशोशियन स्पर्धेत टाकळी विंचूर विद्यालयाने पुन्हा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी लभडे यांनी दिली आहे.

14 वर्षांखालील (मुले) उंच उडी गटात- कु कुणाल जयवंत बोराडे याने 1.61 मीटर उडी मारून उच्चांक गाठला व प्रथम क्रमांक पटकावला.
14 वर्षांखालील (मुली) गटात– गोळा फेक मध्ये 7.92 मीटर. गोळा फेक मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक व उंच उडी स्पर्धेत 1.45 मीटर उंच उडी कु अनुष्का पंडित मोकाटे हिने मैदानावर इतिहास घडवला.

16 वर्षांखालील (मुले) गटात उंच उडीत– कु दर्शन बाजीराव जाधव 1.73 मीटर उंच उडी घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
16 वर्षांखालील (मुली) गटात उंच उडीत– जिल्ह्यात कु ईश्वरी संदिप गांगुर्डे हिने1.40 मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला.तर 16 वर्षांखालील (मुली) गटात 1.35 उंच उडी कु ऋतूजा राजेंद्र कवडे हिने उंच उडी मारून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला.
16 वर्षांखालील मुली रिले 4×100 मध्ये – जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला कु साक्षी रामकृष्ण शिंदे, कु ऋतिका राजेंद्र कवडे, कु ऋतूजा राजेंद्र कवडे व ईश्वरी संदिप गांगुर्डे यांनी रिले स्पर्धा पटकावली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य डॉ सुजित गुंजाळ साहेब स्थानिक सल्लागार समितीचे किशोर शेठ केंगे व सर्व सल्लागार समितीचे सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक लभडे एस डी सर व सर्व शिक्षक बंधू यांनी संजय भाऊ जाधव यांनी अभिनंदन केले. सदर विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक जाधव आर डब्लू सर व अहिरे जे डी सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here