• Home
  • शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांचे दुःखद निधन

शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांचे दुःखद निधन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210222-WA0084.jpg

शिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांचे दुःखद निधन(संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार,श्री आई एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, तसेच कोळी समाजाचे नेते अनंत तरे साहेब यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अनंत तरे साहेब यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक व कोळी समाजाची खूप मोठी हानी झाली असून, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाज पहिलेच अडचणीत असून, त्या अडचणींना वाचा फोडण्याचे व समाजावर अन्याय झाल्यास एकमेव कोळी समाजाचा नेता म्हणून धावून येणारे नेते अनंतजी तरे साहेब होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

anews Banner

Leave A Comment