Home उतर महाराष्ट्र आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पै.प्रविण संगमनेरे राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा...

आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पै.प्रविण संगमनेरे राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_180913.jpg

आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पै.प्रविण संगमनेरे राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

११ ते १६ जानेवारी २०२४ रोजी School Games Fedaration Of India यांच्या वतीने त्यागराज स्टेडियम (नवी दिल्ली) येथे राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन करण्यात आलेले होते. संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्याच्या संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील मल्ल पै. प्रविण गोरख संगमनेरे (खेरवाडी) तालुका निफाड याने १९ वर्षे वयोगटातील ५५ किलो वजनी गटांमध्ये महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करत प्रेक्षणीय खेळाचे प्रदर्शन करत अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे अशी की या संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाला एकमेव सुवर्णपदक हे प्रविण च्या माध्यमातून मिळालेले आहे.
प्रविण ने पहिल्या फेरीमध्ये पंजाबच्या मल्लाला पराभूत केले. दुसऱ्या फेरीमध्ये छत्तीसगडच्या मल्लास पराभूत केले. उपांत्य फेरीत दिल्लीच्या मल्लास पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले व अंतिम फेरीत अटीतटीच्या सामन्यात हरियाणाच्या मल्लाचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.प्रविण हा प.पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्र छायेखाली गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे दैनंदिन सातत्याने कुस्तीचा कसून सराव करत आहे. प्रविणला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी (साहेब), आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS, राष्ट्रीय कुस्ती कोच भरत नायकल (सर), आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच रामफल ठकरान (सर),NIS Qualified कोच पै.विवेक नायकल, कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक पै.राजू पाटील , पै.अक्षय डांगे यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले आहे.प्रविणने मिळवलेल्या या दैदिप्यमान सुवर्ण कामगिरीबद्दल त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous articleविद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम
Next articleरोझ डे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here