Home गडचिरोली विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव...

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_180507.jpg

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा-माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..!

 

अहेरी /गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- विद्यार्थ्यांनी पुस्तकाला आपला मित्र बनवुन,आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा व आपलं ध्येय गाठा असे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे अहेरी येथील स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना जीवनात मोठे ध्येय संपादन करण्यासाठी कठोर मेहनत,जिद्द आणि चिकाटी असणे महत्त्वाची असते,जास्तीत-जास्त पुस्तक वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होतो आणि आपलं ध्येय लवकर गाठता येते असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशरावबाबा आत्राम,प्राचार्य अनिल भोंगळे,माजी प्राचार्य प्रमोद दोतुलवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवराचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.स्नेहसवर्धनोत्सव निमित्ताने विविध कला,समूह नृत्य,क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्याच सुदर सादरीकरण केल.
कार्यक्रमाचे संचालन दिनेश ठिकरे यांनी तर आभार प्रा.उरकुडे यांनी मानले.

यावेळी स्नेहसवर्धनोत्सव कार्यक्रमाला पालक वर्ग,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Previous articleअमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय होणार
Next articleआत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पै.प्रविण संगमनेरे राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here