Home पश्चिम महाराष्ट्र ढेबेवाडी बसस्थानकातुन डिझेल चोरीचा चोरीचा प्रयत्न

ढेबेवाडी बसस्थानकातुन डिझेल चोरीचा चोरीचा प्रयत्न

88
0

राजेंद्र पाटील राऊत

ढेबेवाडी बसस्थानकातुन डिझेल चोरीचा चोरीचा प्रयत्न

ढेबेवाडी (पाटण) :सातारा जिल्ह्यातील काही जुन्या बसस्थानकामध्ये ढेबेवाडी येथील स्थानकाचा समावेश होतो.मोठे उत्पन्न मिळत असतानाही एसटी महामंडळाचे पूर्वीपासूनच स्थानकातील सुविधांकडे दुर्लक्ष सुरू आहे.पाठीमागील बाजूला वाढलेल्या गवत व झुडपांमुळे सापांचा संचार,उघड्यावर कचरा टाकण्यामुळे पसरलेली दुर्गंधी,पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचा अभाव अशा अनेक गैरसोयीमुळे हैराण असलेल्या स्थानकात सुरक्षेचेही बारा वाजले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, विजेचे सुस्थितीतील दिवे आदी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेले पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बसस्थानक चोरट्यानी पुन्हा लक्ष्य केले आहे. पहाटेच्या सुमारास स्थानकात उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठे उत्पन्न देणाऱ्या स्थानकाचे हे दैन्य एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार तरी कधी?असा सवालही यानिमित्ताने नागरिकांतून उपस्थित होत आहे.
घटना घडल्यावर तेवढ्या पुरतीच वॉचमन, सीसीटीव्हीची चर्चा होत. स्थानकात उभ्या मुक्कामी बसच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून चोरट्यानी डिझेल चोरीचा प्रयत्न केला मात्र चालक-वाहकाला जाग आल्याचे लक्षात आल्यानंतर टाकीत सोडलेली रबरी पाईप व डिझेलने भरलेले कॅन तेथेच टाकून चोरट्यांना पळ काढावा लागला. या प्रकरणातून तरी एसटी महामंडळाने काही बोध घेवून जागे व्हावे सुरक्षेचे उपाय करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleजिल्ह्यात 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार;* *कोविड लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज* *: पालकमंत्री छगन भुजबळ*
Next articleविवाहितेचा मानसिक व शारिरिक छळ , दोघांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here