• Home
  • विवाहितेचा मानसिक व शारिरिक छळ , दोघांना अटक

विवाहितेचा मानसिक व शारिरिक छळ , दोघांना अटक

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201219-WA0086.jpg

विवाहितेचा मानसिक व शारिरिक छळ , दोघांना अटक

इचलकरंजी : विवाहितेचा मानसिक व शारिरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी इचलकरंजी गावभाग पोलिसात पती व सासु या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गजानन बबनराव पाटील आणि सासू मंगल बबनराव पाटील (दोघे रा. बुर्ली, ता. पलुस) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी बबन सदानंद पाटील (रा. नारायण मळा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रिती गजानन पाटील (वय 37, मुळ रा. बुर्ली) ही विवाहिता येथील नारायण मळा परिसरात आपल्या माहेरी आली होती. तिने दोन दिवसांपूर्वी घराशेजारीच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. त्यामध्ये पती गजानन पाटील व सासु मंगल पाटील यांच्या घालुन पाडून बोलण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत विवाहितेने नमुद केले होते. त्यामुळे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल बबन पाटील यांनी गावभाग पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती व सासु यांच्या विरोधात तक्रार दिली असून गावभाग पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment