Home सामाजिक रोझ डे

रोझ डे

241
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_195948.jpg

रोझ डे

गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानलं जातं.व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात रोझ डे पासूनच होते.या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.आजकाल फक्त प्रेमी जोडपेच नाही तर मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ मौज म्हणून व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात
रोझ डे हा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचा एक भाग आहे.हा दिवस सर्वात सुंदर गुलाबाचे फूल,गुलाबाबद्दल आपुलकी, प्रेम व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.हल्ली विवाह सोहळा आणि सणांसह विविध उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये गुलाबांचा वापर केला जातो.रोझ डे काही फक्त गुलाब देणे आणि घेणे नाही तर या फुलाचे सौंदर्य,सुगंध आणि साज साजरे करणे देखील आहे.विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना गुलाब आणि शुभेच्छा देऊन रोझ डे साजरा करतात.
अलीकडच्या काळात रोझ डे जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.सर्व वयोगटातील लोक या उत्सवात सहभागी होतात.रोझ डे हा दिवस आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याचा आणि आयुष्यभर टिकणा-या आठवणी बनवण्याचा दिवस आहे.

🌹 रोझ डे च्या हार्दिक शुभेच्छा
लैलेशा भुरे
नागपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here