Home भंडारा भंडारा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे जिल्ह्यातील...

भंडारा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे जिल्ह्यातील मजुरांची एकच गर्दी

301

आशाताई बच्छाव

IMG_20240207_190603.jpg

भंडारा येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे जिल्ह्यातील मजुरांची एकच गर्दी

युवा मराठा जिल्हा प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी घेतलेली प्रत्यक्ष भेट

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे आज दिनांक 6 फरवरी 2023 रोज बुधवार ला पत्रकार संजीव भांबोरे यांनी भेट दिली असता भंडारा जिल्ह्यातील तुमसर ,मोहाडी, लाखनी, साकोली लाखांदूर, पवनी, भंडारा तालुक्यातील कामगार मजुरांनी मुलांच्या कॉलरशिप फार्म, पेटी करता फार्म, व कामगार नूतनीकरण कार्ड करण्याकरिता हजारोच्या संख्येने कामगार कार्यालयात गर्दी केल्याने सकाळी 6 वाजेपासून उपासी ,पाण्याविना ,उन्हातानात रांगा दिसून आल्या .या ठिकाणी एखाद्या कामगाराच्या मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सुद्धा कामगारांनी उपस्थित केलेला आहे ?त्या कार्यालयात कोणत्याही प्रकारची बसण्याकरता व्यवस्था दिसून आली नाही .डांबरीकरण रस्त्यावर बसून कामगारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या .जिल्ह्यातील सर्व मजुरांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलावण्यापेक्षा त्याच तालुक्याच्या ठिकाणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केलेली आहे .त्याचप्रमाणे सदर जनप्रतिनिधी यांनी सुद्धा याकडे लक्ष घालून कामगारांच्या सुविधेकरता त्याच तालुक्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे मागणी सुद्धा कामगारांतर्फे करण्यात येत आहे.

Previous articleरोझ डे
Next articleमाजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विचारांची निष्ठा सर्वसामन्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न- आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.