Home Breaking News ग्रामीण भागातील गॅस ऐवजी परत पेटल्या चुली….! गृहिणींचे बजेट कोलमडले;शंभरीचा गॅस ठरला...

ग्रामीण भागातील गॅस ऐवजी परत पेटल्या चुली….! गृहिणींचे बजेट कोलमडले;शंभरीचा गॅस ठरला नाका पेक्षा मोती जड….

130
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामीण भागातील गॅस ऐवजी परत पेटल्या चुली….!

गृहिणींचे बजेट कोलमडले;शंभरीचा गॅस ठरला नाका पेक्षा मोती जड….

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/ युवा मराठा न्युज नेटवर्क

 

:शासनाद्वारे उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्त्यांना शंभर रूपयांच्या सवलतीत माफक दरामध्ये उज्वला गॅस जोडणी दिली.परंतु याच गॅस सिलिंडरचे भाव गगणाला भीडल्याने गृहिनिंच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडल्याने हा शंभरीतील गॅस आता नाका पेक्षा मोती जड झाला आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर या आठवड्यात सहाशे पन्नास रुपयांवर जाऊन धडकले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून सिलिंडरसाठी एकत्रित रक्कम जमविताना या लाॅकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध नसल्याने पैसे जमविताना दमछाक होत आहे.घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नाही.गॅस सिलिंडर खरेदी वेळी पूर्ण रक्कम द्यावी लागते. अनेक वेळा सामान्य नागरिकाकडे एकत्र रक्कम नसते स्वयंपाक करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक काही वर्षा पूर्वी चूल किंवा स्टोव्हचा वापर करीत होते.परंतु हळूहळू काळ बदलला श्रीमंत व साधारण लोकांच्या बरोबरीने सर्वसाधारण व सामान्य घरातील नागरिकही गॅस कनेक्शन घेण्याकडे वळु लागले.मागील काही वर्षात शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शनधारकांची संख्या वाढली आहे.
ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून अनेक गॅस लाभार्थ्याना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे दारिद्रय़रेषे खालील नागरिकांकडे सुद्धा गॅसची सोय झाली. महिलांना सरपणातून निघणा-या धुरापासून मुक्ती मिळावी, ग्राहकांना त्याचे आरोग्य चांगले राहावे,या आधी चुलीवरील  स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात लाकुड-सरपनाचा वापर व्हायचा .त्यामुळे जंगलातील वृक्षतोड कमी व्हावी यासाठी सरकारने गॅस कनेक्शन सवलतीच्या दरात वाटले.परंतु गेल्या काही वर्षांत सातत्याने होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किंमतीची दरवाढ सामान्यांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुदान दिले जाते. ही सबसिडी म्हणजेच अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.परंतु मार्च पासून सबसिडी नाही आणि अनुदानही नाही. सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घेताना एकूण रक्कम ग्राहकांना जमा करावी लागते .परंतु सर्वसाधारण कुटुंबातील मोलमजुरी  करून उदरनित्राह चालविना-या व्यक्तिला एकाचवेळी ही रक्कम भरणे जड जात झाले आहे . हळूहळू गॅसच्या दरात मध्ये दर आठ दिवसांनी वाढ होताना दिसते.त्यामुळे गॅस कनेक्शन असूनही अनेक ग्राहकांना सिलिंडर खरेदी करणे शक्य होत नाही . पर्यायाने त्यांनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा ,चुल सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे.घर चालविताना सामान्य  माणसाला घर चालविणे कठीण झाले आहे.गृहिणी घरखर्चातील पैशांची बचत करून सिलिंडरसाठी पैसे साठवुन ठेवत होत्या. परंतु दुशकाळाच्या परीस्थितीत हाताला काम नसल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे

बंद झालेल्या चुली परत पेटल्या…

गॅस सिलिंडर चे दर प्रत्येक आठवड्याला वाढत चालले असून गुहनिचे बजट अक्षरशः कोलमडून गेले आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील बंद केलेल्या चुली परत पेटल्या असुन महिलांना पुन्हा धुराच्या विळख्यात स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे चोंडी येथे अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर!!
Next articleशिवसेना उपनेते अनंत तरे साहेब यांचे दुःखद निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here