Home नाशिक श्रीक्षेत्र वनसगाव (कारवाडी) येथे ८ फेब्रुवारीपासून धर्मनाथ बीज महोत्सव—

श्रीक्षेत्र वनसगाव (कारवाडी) येथे ८ फेब्रुवारीपासून धर्मनाथ बीज महोत्सव—

78
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240206_131922.jpg

श्रीक्षेत्र वनसगाव (कारवाडी) येथे ८ फेब्रुवारीपासून धर्मनाथ बीज महोत्सव—

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

कै टी वाय शिंदे साहेब यांच्या संकल्पपुर्तीने श्री गोरक्षनाथ मंदिर समिती वनसगांव (कारवाडी) गोरक्षनाथ नगर येथे जगत श्रेष्ठ नवनाथांच्या कृपेने व सदगुरु सदाशिवनाथ महाराज यांचे कृपा आशिर्वादाने व श्री. श्री. १००८ महामंडलेश्वर प. पु. स्वामी शिवगिरीजी महाराज श्री पचदशनाम जूना आखाडा यांचे प्रेरणेने तसेच ह. भ. प. सद्गुरु निवृत्ती महाराज रायते यांचे मार्गदर्शनातुन ॐ श्री समर्थ सद्गुरु सदाशिवनाथ महाराज संस्था नासिक संचालित विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने गुरुवार ८ फेब्रुवारी ते रविवार ११ फेब्रुवारी अखेर धर्मनाथ बिज सोहळा आयोजित केला आहे. तरी परिसरातील तमाम भाविकांनी संतदर्शनाचा व किर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ वनसगाव नाथ भक्त मंडळ व भजनी मंडळ यांनी केले आहे.

दैनंदिन कार्यक्रम– रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, हरीपाठ प्रवचन: ह.भ.प.श्री. गोटीराम महाराज मांडवडकर, ह.भ.प. गणपत बाबा लगड.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे-

गुरुवार ८ फेब्रुवारी रात्री ९ ते ११ ह भ प प्रशांत महाराज जाधव वडाळीभोई नाथ भक्त नाथ सागर परिवार यांचे कीर्तन, अन्नदाते- रंगनाथ हरिभाऊ शिंदे वनसगाव, शुक्रवार 9 फेब्रुवारी रात्री ९ ते ११ हभप ऋषिकेश महाराज कुयटे धानोरे यांचे कीर्तन सायंकाळचे अन्नदाते विश्वनाथ शंकर कापडी, शनिवार 10 फेब्रुवारी रात्री ९ ते ११ ह भ प प्रशांत महाराज रायते खडक माळेगावकर यांचे कीर्तन सायंकाळचे अन्यथा ती अशोक माधव ढोमसे उगाव, रविवार 11 फेब्रुवारी सकाळी नऊ ते अकरा धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगावकर अखिल भारतीय वारकरी मंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होईल महाप्रसादाचे अन्नदाते- राम विजय क्लिनिक व पॅरेलेसिस केअर सेंटरचे संचालक डॉ योगेश रामदास डुंबरे वनसगाव.या कार्यक्रमासाठी हभप अण्णा महाराज कानिफनाथ आश्रम सोनेवाडी तसेच नाथ भक्त नाथ सागर परिवार भुताने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.ओम श्री समर्थ सद्गुरु सदाशिवनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे सदस्य समस्त कापडी परिवार कारवाडी वनसगाव यांचे संयोजन असून या कार्यक्रमासाठी गायनाचार्य म्हणून हभप ऋषिकेश महाराज नवले सोमठाणे,हभप नवनाथ महाराज बत्तासे चांदगाव,हभप विनोद महाराज शिंदे (डोंगरगाव) ,हभप केशव महाराज रायते (खडक माळेगाव) भास्कर आप्पा गारे, केशव महाराज गारे, कचरू नाना शिंदे, नवनाथ बोरगुडे, अरुण घायाळ, ज्ञानेश्वर ढवळे, धोंडीराम शिंदे ,अरुण भाऊ गारे, उत्तमराव शिंदे, ढोमसे भाऊ, अशोकराव गारे, गोपाळ महाराज शिंदे, ओंकार महाराज रायते, नवनाथ महाराज बदादे, संदीप महाराज जाधव, सुदाम शिंदे ,महेश महाराज जाधव, राजेंद्र शिंदे मोतीनाना पानगव्हाणे, ह भ प लक्ष्मण महाराज शिंदे ,संजय कोटकर व उगाव भजनी मंडळ पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ राहणाऱ्या असून विणेकरी जयराम बाबा खानगाव व गणपत बाबा लगड सोनेवाडी, मृदंगाचार्य म्हणून हभप ओंकार महाराज रायते, संजय महाराज काळे, दत्त महाराज साळवे ,मच्छिंद्र महाराज आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here