Home जालना मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती सोहळा 2024 ची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी...

मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती सोहळा 2024 ची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी अशोक पडुळ यांची सर्वानुमते निवड

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_214109.jpg

मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती
सोहळा 2024 ची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी अशोक पडुळ यांची सर्वानुमते निवड
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ) ः मराठा क्रांती मोर्चा प्रणित सार्वजनिक शिवजयंती सोहळा 2024 ची कार्यकारिणी आज दि. 3 रोजी मराठा सेवा संघ कार्यालय भाग्यनगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये घोषीत करण्यात आली असून सर्वानुमते अशोक पडुळ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विष्णूभाऊ पाचफुले तर मार्गदर्शक डॉ. संजय लाखे पाटील, राजेश राऊत, अरविंद देशमुख, संतोष गाजरे, शरद देशमुख, राजेंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवजयंतीच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. तसेच उर्वरित कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी किरण शिरसाठ, साई पाचफुले, सुवर्णा राऊत, उपाध्यक्ष संतोष कर्‍हाळे पाटील, रोहीत देशमुख, दीपाली दाभाडे, प्रताप देठे. तर सचिवपदी शुभम टेकाळे, असिफ पठाण, सागर पाटील, कोषाध्यक्ष करण जाधव, रमेश गजर, संघटक आकाश जगताप, ज्योती मुजमुले, गणेश गायकवाड, सहसचिव बाळासाहेब देशमुख, नरसिंग पवार तसेच प्रसिध्दी प्रमुख म्हणून पत्रकार संतोष भुतेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी कृष्णा पडुळ, राजेंद्र जाधव, दिनेश फलके, दत्ता पाटील शिंदे, महेश निकम, अंकुश पाचफुले, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, शरद देशमुख, जयंत भोसले, ज्ञानेश्वर ताकट, अमर पवार, सुनिता येवले, दिलीप शिंदे, महादेव टाले, आकांक्षा येवले आदींसह शिवप्रेमींची उपस्थिती होती.

Previous articleलिव्ह इन रिलेशनशिप
Next articleहळदी- कुंकू समारंभात वैशालीताई घाटगे यांनी जपला सर्वधर्मसमभाव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here